मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हा माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता. त्याच्या हत्येचं आपल्यालाही दुख: आहे. मात्र या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. त्यातूनच आपलं नाव पुढे केलं जात आहे. पण या प्रकरणाशी आपला काही एक संबध नाही. उलट या हत्येत जो कोणी असेल, अगदी माझ्या जवळचा जरी असला तरी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहीजे अशी आपली भूमिका असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्या विभागाची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. विरोधकांनी तर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यात भाजपचे आमदारही मागे नाहीत. त्यामुळे धनंजय मुंडे यांची चारही बाजूने कोंडी झाली होती. त्यात त्यांना मंत्री केलं जातं की नाही याची चर्चा सुरू होती. पण अखेरच्या क्षणी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या टीकेची धारण आणखी वाढत गेली. हत्या करणाऱ्यांचा मास्टरमाईंड कोण अशी विचारणा विरोधक करत होते. त्यावर चौकशी करा. दोषी असेल त्याला शिक्षा करा असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी मस्साजोगच्या गावकऱ्यांना अजित पवारांकडे केली होती. बारामतीतही एक शिष्टमंडळ अजित पवारंना भेटले होते. त्यांनी ही अशीच मागणी केली होती. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली. ज्यांनी कोणी हत्या केली. त्यांना शिक्षा झाली पाहीजे. ते फासावर गेले पाहीजेत. या मताचा मी पहिल्या दिवसापासून होतो असं धनंजय मुंडे म्हणाले.
संतोष देशमुख यांच्याबाबत आदर होता. तो माझ्या जिल्ह्यातील सरपंच होता. जे कोण त्याचे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे. मग ते कोणी असतो. ते कोणाच्याही जवळचे असतो. अगदी माझ्या जवळचे असले तरी त्याला सोडू नका अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. पण हे सांगत असताना राजकारणापोटी माझ्यावर आरोप केले जात आहे. ते चुकीचे आहे. हे आरोप थांबवले गेले पाहीजे असं मी सांगेन असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजिक करण्यात आली होती. त्या बैठकीला धनंजय मुंडे यांनी संबोधीत केले. शिवाय पुढील पाच वर्षात विभागाचा प्लॅन काय असेल याची माहिती त्यांनी विभागाकडून घेतली. त्याच बरोबर पुढील शंभर दिवसांचा रोड मॅप काय असला पाहिजे. तो सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world