काँग्रेस सोबत ठाकरे यांना सत्ता स्थापन करायला लावणाऱ्या संजय राऊत यांच्याकडून हिंदुत्ववादी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी कुंभ मेळ्यात गंगेच्या स्नानाला जाऊ नये असं मत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांनी कुंभमेळ्यात स्नान केले तर गंगा मैली होऊन असं ही ते म्हणाले. त्यामुळे ही घाण इथच नारळाच्या झाडाखाली राहू द्या. गंगेत घाण घेऊन जाऊ देऊ नका. अशी बोचरी टीका शहाजी बापू यांनी केली आहे. मात्र उद्धव ठाकरेंनाही त्यांनी या निमित्ताने एक सल्ला दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुंभमेळ्यातील शेवटचे स्नान 26 फेब्रुवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कुंभमेळ्यात स्नान करणं हे हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. त्यामुळे जगभरातून भाविक या कुंभमेळ्यासाठी आले आहेत. जगभरातून जसे भाविक आले तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण प्रयागराज इथं आले होते. त्यात अनेक राजकीय पक्षाचे नेते ही दिसले. या पार्श्वभूमीवर शहाजी बापू यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबत ही वक्तव्य केलं. मी धक्कापुरुष झालोय. असे उद्धव ठाकरे यांनी विधान केले होते. याबाबत ,उद्धव ठाकरेंना कुणीही धक्का देत नाही. उद्धव ठाकरे यांची वर्तवणूकच त्यांना धक्का देत आली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःबाबत आत्मचिंतन करावे, असा थेट सल्लाच शहाजी बापूंनी दिली. ते येवढ्यावरच थांबले नाहीत, तर उद्धव ठाकरे यांनी आता खऱ्या शिवसेनेत यावे, अशी ऑफरही देऊन टाकली. त्यांनी दिलेल्या या ऑफरचे पडसाद शिवसेना ठाकरे गटात नक्कीच उमटतील.
ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: मर्सिडीज वरून राजकारण सुसाट! गोऱ्हेंकडे आता थेट पावत्यांची मागणी
दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीजबाबत केलेले वक्तव्य सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. याबाबत ही शहाजी बापूंना काय वाटतं ते त्यांनी सांगितलं आहे. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत. घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय नीलम गोऱ्हे मर्सिडिज बाबत असे विधान करणार नाहीत, असं म्हणत बापूंनी नीलम गोऱ्हे यांचीच बाजू घेतली आहे. शहाजू बापू पाटील यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.