जाहिरात

Sena vs Sena: टायरवाल्या काकू, खेळण्यातली मर्सिडीज! ठाकरेंच्या रणरागिणींचा निलम गोऱ्हेंच्या घराबाहेर जोरदार राडा

उद्धव ठाकरेंना मर्सिडीजची लालसा नाही. असं असताना ही निलम गोऱ्हे यांची उद्धव ठाकरें बद्दल बोलण्याची हिंमत कशी होते, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Sena vs Sena: टायरवाल्या काकू, खेळण्यातली मर्सिडीज! ठाकरेंच्या रणरागिणींचा निलम गोऱ्हेंच्या घराबाहेर जोरदार राडा
पुणे:

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मर्सिडीजबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोऱ्हे यांच्या विरोधात ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. पुण्यात निलम गोऱ्हे यांचे घर आहे. या घरा बाहेर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या थडकल्या. त्यांनी गोऱ्हेंच्या घराबाहेर जोरदार राडा केला. यावेळी या महिला आपल्या बरोबर खेळण्यातील मर्सिडीज घेवून आल्या होत्या. शिवाय टायरवाल्या काकू अशा आशयाचे बॅनरही त्यांच्या बरोबर होते. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे गोऱ्हे यांच्या घराबाहेर एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिल्याचा गंभीर आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता. त्यांनी दिल्लीत केलेल्या या वक्तव्याचे पडसाद मात्र महाराष्ट्रात उमदटले. गोऱ्हे यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. निलम गोऱ्हे यांनी आतापर्यंत किती मर्सिडीज दिल्या आहेत याचा हिशोब आता मागितला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: मर्सिडीज वरून राजकारण सुसाट! गोऱ्हेंकडे आता थेट पावत्यांची मागणी

एकीकडे गोऱ्हे यांच्यावर शिवसेनेतील नेते टीकेची झोड उठवत असताना पुण्याती शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या या भलत्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी निलम गोऱ्हे यांच्या पुण्याती घराबाहेर धडक दिली. त्यांनी टायरवाल्या काकू अशा आशयाचे बोर्ड बरोबर घेतले होते. शिवाय खेळण्यातील मर्सिडीद गोऱ्हेंना भेट देण्यासाठी त्या आल्या होत्या. ही मर्सिडीज घेवून निलम गोऱ्हे यांनी गरागरा फिरावे असं या महिला यावेळी म्हणाल्या. शिवाय त्यांनी आतापर्यंत किती मर्सिडीज दिल्या आहेत त्याच्या पावत्या द्याव्यात अशी मागणी ही त्यांनी केली.   

ट्रेंडिंग बातमी - Neelam Gorhe : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने खळबळ

निलम गोऱ्हे ज्या वेळी शिवसेनेचे कार्यक्रम पुण्यात घेत होत्या, त्यावेळी सर्व सामान्य कार्यकर्त्याला त्या खर्च करण्यासाठी सांगत होत्या. शिवाय महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी त्या पैशांची मागणी करायच्या असा आरोप ही या महिलांनी यावेळी केला. निलम गोऱ्हे यांच्याकडे ऐवढा पैसा कुठून आला आहे. ते आता समोर आले पाहीजे. शिवाय त्या चार चार मर्सिडीज देवू शकतात, तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असणार. याची चौकशी ईडी मार्फत केली जावी असं ही या महिला यावेळी म्हणाल्या. 

ट्रेंडिंग बातमी - बोगद्यात गुडघ्यापर्यंत चिखल, 24 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू; 8 मजुरांना बाहेर काढण्याचं मोठं आव्हान

उद्धव ठाकरेंना मर्सिडीजची लालसा नाही. असं असताना ही निलम गोऱ्हे यांची  उद्धव ठाकरें बद्दल बोलण्याची हिंमत कशी होते.  त्यांनी खाल्ल्या अन्नाला जागायला पाहीजे होते. आता तर त्यांनी मर्सिडीजच्या पावत्या दाखवाल्यात असं आव्हान या महिलांनी यावेळी दिलं. त्यांना आता आणखी मोठ्या पदाची लालसा आहे. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पण त्यांना आत  शिवसेना काय आहे हे समजेल असं ही या महिला यावेळी म्हणाल्या. काही महिलांनी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न ही केला.