Sharad pawar: 'महिलांना त्यांनी सोडलं, हिंदू म्हणून मारलं याबाबत माहित नाही' पवारांच्या वक्तव्याने...

काश्मिर मधून 370 कलम आम्ही हटवंल. त्यानंतर तिथं सर्व काही ठिक आहे असं सरकारच्यावतीने दाखवण्यात आलं असं पवार म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
सिंधुदुर्ग:

पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या हल्लानंतर देशात संतापाची लाट आहे. त्यात धर्म कोणता असं विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असं सांगितलं जात आहे. असं असताना शरद पवारांनी मात्र थोडं वेगळं वक्तव्य केलं आहे. हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या याबाबत आपल्याकडे काही माहिती नाही असं ते म्हणाले. पण त्यांनी महिलांना सोडलं असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या, याबाबत काय सत्य आहे हे मला माहिती नाही. पण  तिथं जी लोक होती, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसतय. मी एका बहीनीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना त्यांनी हात लावले नाहीत. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला. असं शरद पवार म्हणाले. सध्या ते सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

ट्रेंडिग बातमी - Pahalgam attack: भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर जगाचा पाठिंबा कुणाला? अमेरिका, रशिया, चीन कुणाच्या बाजूनं?

काश्मिर मधून  370 कलम आम्ही हटवंल. त्यानंतर तिथं सर्व काही ठिक आहे असं सरकारच्यावतीने दाखवण्यात आलं. पण तिथल्या लोकांची, काश्मिरी जनतेची  मते वेगळी आहेत. आम्ही दहशतवाद मोडून काढला आहे. आता काय चिंता नाही असं सरकारनं सांगितलं होतं. तसं असेल तर आनंद आहे. पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. सरकारकडून चूक झाली आहे. सरकारने ते मान्य केले आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं ही ते यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Exclusive: देश सुरक्षित हातात, मग अशा घटना का होतात? वीर योद्धे नायक दीपचंद यांचा क्रोध

या आधीही दहशतवादी हल्ले झाले आहेत. तेव्हा धर्माची चर्चा झाली नव्हती. पण आज धर्माची चर्चा सुरू आहे. घडलं ते वाईट आहे. पण देशात धार्मिक तणाव वाढेल असं काही घडू नये असं ही ते म्हणाले. पण या हल्ल्याचा परिणाम निवडणुकावर होतील असं मला वाटतं असं ही ते यावेळी म्हणाले. सरकारने या पुढच्या काळात जे काही निर्णय घ्यायचे आहे ते विचारपूर्वक घ्यावेत असं ही पवार यावेळी म्हणाले. 

Advertisement