शरद पवारांचा खासदार कुख्यात गुंडाच्या भेटीला, पुण्यात नेमकं काय झालं?

गजा मारणे याची पुण्यात दहशत आहे. कुख्यात असल्याने त्याच्यापासून चार हात लांब राहलेले बरं अशीच काहींची भूमीका आहे. मात्र राजकारणी त्यास अपवाद आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याची पुण्यात दहशत आहे. कुख्यात असल्याने त्याच्यापासून चार हात लांब राहलेले बरं अशीच काहींची भूमीका आहे. मात्र राजकारणी त्यास अपवाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी नुकतीच गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली. यावेळी गजा मारणे याने लंके यांचा सत्कार ही केला. लंके यांची प्रतिमा एक सर्व सामान्य कुटुंबातील सर्व सामान्यांचा नेता अशी आहे. या छबीवरच त्यांनी लोकसभेचे मैदानही मारले. मात्र गजा मारणेच्या भेटीनंतर ते नव्या वादात अडकण्याची दाट शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या घरी गेले होते. यावेळी गजा मारणेकडून खासदार निलेश लंकेचा सत्कार करण्यात आला. लंके गजा मारणेच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.  काही दिवसां पूर्वी पार्थ पवार यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवार यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. टिका करण्यामध्ये शरद पवार गट आघाडीवर होता. मात्र आता आपल्याच पक्षाचा खासदार गजा मारणेला भेटला यामुळे राशपची कोंडी झाली आहे. त्याला ते काय उत्तर देतात ते पाहालं लागणार आहे. विशेष म्हणजे निलेश लंकेंची प्रतिमा ही सर्व सामान्यांचा नेता अशी आहे. अशा वेळी कुख्यात गुंडाला ते का भेटतात? त्याच्याकडून सत्कारही स्विकारतात असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. 

Advertisement

हेही वाचा - लोकसभेनंतर आता विधानसभेवर दावा, सांगलीत काँग्रेसचं काय चाललंय?

काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवून गजा मारणेला पोलीस आयुक्तांकडून समज देण्यात आली होती. शिवाय पुण्यातल्या कुख्यात गुंडांची परेडही घेण्यात आली. त्यात गजा मारणेही होता. काही दिवसांपूर्वीच गजा मारणेच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गजा मारणेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गुन्हे दाखल आहेत. जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. त्या विरोधातही गुन्हा दाखल आहे. 

Advertisement

Advertisement