देवा राखुंडे, प्रतिनिधी
दुरावलेली घराणी एकत्र येणार का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात पुण्यात बंद दाराच्या आड चर्चा झाली. त्यामुळे काका-पुतणे एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. या विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील गोंधळात टाकणारी प्रतिक्रिया दिली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या मुद्यावर संजय राऊत अस्वस्थ असले तरी ते स्वत: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू एकत्र यावे यासाठी प्रयत्नशील आहेत. राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव यांच्यासोबत जाण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यावर उद्धव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज यांना सशर्त सोबत घेण्याची तयारी दाखवली होती. या सर्व विषयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले पवार?
जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लीगलं. ऊसाच्या उत्पादनवाढीच्या प्रश्नावर आम्ही वर्षभर काम करत आहोत. शेवटी काम करुन उपयोग नाही. तर त्यासाठी सरकार यावं लागतं, असं शरद पवारांनी या भेटीवर स्पष्ट केलंय. सरकारच्या प्रतिनिधींशी बोलणे काहीही चुकीचे नाही, असं पवार यांनी स्पष्ट केले. ते बारामतीमध्ये बोलत होते.
ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा देखील सध्या सुुरु आहे. त्यावर शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर याबाबत मला काही माहिती नाही. मी त्यांच्याशी काही बोललो नाही. त्यावर भाष्य कसं करु? असा सवाल त्यांनी विचारला.
( नक्की वाचा : Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ? )
राज्यात पाणी संकट
राज्यात माझ्यामते 43% पाणीसाठी आहे. ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. हे यापूर्वी देखील घडलं होतं. शेतकरी पाणी जपून वापरतील अशी माझी खात्री आहे. मे आणि जून हे दोन महिने आणखी काढायचे आहेत, असं पवार यावेळी म्हणाले.
एआयची सुरुवात बारामतीध्येच झाली. गेली दोन वर्ष आम्ही याचा अभ्यास करत आहोत. शेतकऱ्यांनी याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करावा. राज्य सरकारनं आणखी पाच पिकांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं जाहीर केलंय, याचा आनंद आहे असं पवार म्हणाले.