नंबर गेम! शरद पवारांचे मोठं भाकीत, महायुतीचे टेन्शन वाढले?

लोकसभा निवडणुकीत मविआला किती जागा मिळतील हा शरद पवारांचा अंदाज अत्यंत तंतोतंत बरोबर होता. त्यामुळे विधानसभे बाबतचा त्यांचा अंदाज महायुतीच्या उरात धडकी भरवणाराच आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारत 48 पैकी 31 जागा जिंकत महायुतीचा धुव्वा उडवला. त्यानंतर महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आघाडीवर आहे. आजही भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली.जनतेचा आणि पक्षाचा घात केला अशा लोकांना या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचा आहे, असा इशाराच पवारांनी दिला. शिवाय सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा अंदाजही सांगितला. लोकसभा निवडणुकीत मविआला किती जागा मिळतील हा शरद पवारांचा अंदाज अत्यंत तंतोतंत बरोबर होता. त्यामुळे विधानसभे बाबतचा त्यांचा अंदाज महायुतीच्या उरात धडकी भरवणाराच आहे. 

शरद पवारांचे भाकीत काय? 

2019 साली लोकसभा निवडणुकीत विरोधकांना 48 पैकी 06 जागांवर विजय मिळाला होता. त्यातल्या चार जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या असे शरद पवार यांनी सांगितले. पण गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातल्या जनतेला वेगळा अनुभव आला. त्यामुळे त्यांनी निश्चिय केला. बदल झाला पाहीजे हे त्यांच्या मनात होते. त्यामुळेच लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना तब्बल 31 जागांवर विजय मिळाला. आता राज्यही चुकीच्या लोकांच्या हातात आहे हे जनतेला समजले आहे. त्यामुळे जनता पुन्हा एकदा बदल करण्याच्या मनस्थितीत आहे. सध्याची जी परिस्थिती दिसते त्यानुसार महाविकास आघाडीला 288 पैकी 225  जागा मिळतील अशी स्थिती आहे असे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे आता पासूनच कामाला लागा. तुम्हाला ताकद देण्याची माझी जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.जर या सरकारला घालवायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देण्याची गरज असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. 

Advertisement

'पक्षाचा घात केला त्यांना धडा शिकवा' 

 ज्यांनी पक्षा बरोबर घात केला. लोकांचा विश्वास तोडला त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार शरद पवार यांनी यावेळी केला. उद्गिर आणि देवळाली  या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले. पण निवडून आल्यानंतर त्यांनी पक्षा बरोबर आणि जनते बरोबर घात केला. एका विचाराने मते मागीतला आणि निवडून आल्यानंतर भिन्न विचारांच्या लोकांबरोबर गेले. अशा लोकांना या निवडणुकीत धडा शिकवायचा आहे असे शरद पवार या वेळी म्हणाले. ज्यांना पक्षाने आणि जनतेने प्रतिष्ठा दिला त्यांना आता धडा शिकवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  

'राज्यात सत्ता आणूया' 

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यातून ठिकठिकाणचे नेते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. महाराष्ट्राचे चित्र सध्या बदलत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला शक्ती देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्यासाठी जबरदस्त शक्ती आपल्याला उभी करावी लागेल. राज्यात सत्ता बदल करायचा आहे. सत्ता बदलानंतर राज्यातल्या जनतेचे जिवनमान बदलायचे आहे. प्रत्येक घटकातील जाती, धर्माच्या लोकांचे जिवनमान उंचावयाचे आहे असेही पवार म्हणाले. त्यामुळे कामाला लागा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणूयात असेही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement