शरद पवारांचा नवा डाव, भाजपाला देणार हादरा! दसऱ्यानंतर बडा नेता करणार सीमोल्लंघन?

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इनकमिंग जोरात सुरु झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि महायुतीमधील नेत्यांना पक्षात घेण्याचा सिलसिला पवारांनी सुरु केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इनकमिंग जोरात सुरु झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि महायुतीमधील नेत्यांना पक्षात घेण्याचा सिलसिला पवारांनी सुरु केला आहे. पुणे शहरातील बडे नेते संजय काकडे देखील लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. काकडेंनी  साथ सोडली तर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला हा मोठा धक्का असेल.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

संजय काकडे दसऱ्यानंतर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या पत्नींनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. संजय काकडे हे राज्यसभेचे माजी खासदार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या काही दिवसापासून संजय काकडे हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या

पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक असलेले संजय काकडे हे सुरुवातीला अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेतील भाजपाच्या विजयात त्यांचं महत्तवाचं योगदान होतं. काकडे 2019 आणि 2024 मध्ये पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण, भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नव्हती. 

( नक्की वाचा : 'व्यक्तीला विरोध नाही, डोंबिवली बकाल कुणी केले ?' RSS च्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सवाल )

काकडे यांनी ऑगस्ट महिन्यात शरद पवारांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली होती. काकडे यांनी ती भेट वैयक्तिक कारणांसाठी असल्याचा खुलासा केला होता. पण, त्यानंतरही त्याचे राजकीय अर्थ काढण्यात आले होते. 
 

Topics mentioned in this article