शरद पवारांनी बारामतीतच दादांना फटकारलं, थेट बोलले

जाहिरात
Read Time: 3 mins
बारामती:

शरद पवार सध्या लेक सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी ते मुख्यमंत्री, कृषीमंत्री असताना काय काय केलं हे जनतेला सांगत आहे. कधी ते भावनीक साद घालत आहेत तर कधी विरोधकांवर तुटून पडताना दिसत आहे. त्यांचे हे रूप पुन्हा एकदा बारमतीकरांनी अनुभवलं. यावेळी त्यांच्या टार्गेटवर होते उपमुख्यमंत्री अजित पवार. शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे येणाऱ्या काळात पवार विरूद्ध पवार असं वाकयुद्ध बारामतीच्या रिंगणात रंगणार हे निश्चित आहे. 

काय म्हणाले शरद पवार? 
शरद पवारांचं आता वय झालं आहे. त्यांनी आता कुठे तरी थांबलं पाहीजे असा सल्ला अजित पवारांनी दिला होता. तोच धागा पकडत शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधक म्हणतात माझं वय झालं आहे. मी 84 वर्षाचा झालोय. पण  माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितले आहे माझं ? मी थंबणार नाही. असा थेट इशाराच शरद पवारांनी दिला आहे. त्यामुळे काही झालं तरी लढत राहाणार हा संदेशच त्यांनी यामाध्यमातून दिला आहे. वया पेक्षा इच्छाशक्ती महत्वाची,जिद्द महत्वाची असचं ते म्हणाले. शरीराने म्हातारा झालो असलो तरी मनानं तरूण आहे हेच पवारांनी एक प्रकारे सांगितलं.  

Advertisement

राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली? 
काही लोकांनी पक्ष पळवला, पक्ष चिन्ह पळवलं. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली हे सर्वांना माहित आहे. संकट येतात पण संकटातून वाट काढायची असते असं सुचक विधानही यावेळी त्यांनी केलं. अनेकांना आमदार खासदार केलं. मंत्रीपद दिलं. पण त्याच लोकांनी आज वेगळी भूमिका घेतली आहे. ते आज कोणा बरोबर जावून बसले आहेत हे जनता पाहात आहे. त्यांना जनताच उत्तर देईल असंही ते म्हणाले. भविष्यात अनेक नविन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Advertisement

सुप्रिया सुळेंचं केलं कौतूक 
सुप्रिया सुळे या लोकसभेत सक्रीय असतात. त्यांची लोकसभेतील उपस्थिती ही ९० टक्क्या पेक्षा जास्त आहे, असं यावेळी पवारांनी आवर्जून सांगितलं. आपल्यालाही जास्त वेळ कामकाजात सहभाग घेता येत नाही. ही खंत ही त्यांनी व्यक्त केली. राज्यसभेतली आपली उपस्थिती सुप्रिया सुळेंच्या तुलनेत कमी असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे जी व्यक्ती तुमचे प्रश्न मांडेल अशी व्यक्ती लोकसभेत गेली पाहीजे असं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

नरेंद्र मोदींवरही केली टिका 
कृषी मंत्री असताना गुजरातला मोठ्या प्रमाणात मदत केली होती असं शरद पवार म्हणाले.  त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. त्यांना बारामतीला यायाचं होतं. ते इथं येवून पवारांनी मला सर्व काही शिकवलं असं म्हणाले. मात्रनंतर त्यांनी भूमिका बदलली. त्यांच्या काळात विरोधकांना दडपलं जात आहे. झारखंड दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. ही लोकशाही नाही तर हुकुमशाही असल्याची टिका त्यांनी केली. सध्या बेरोजगारी, महागाई हे मोठे प्रश्न आहे. सत्ता ही मुठभर लोकांच्या हातात आहे. तसं होता कामा नये असंही ते म्हणाले.