संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावानं सध्या राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. गावकऱ्यांच्या इच्छेचा मान घेऊन या गावात बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं ही विरोधकांची मागणी आहे. शरद पवार, जयंत पाटील यांनी रविवारी माकडवाडीमध्ये सभा घेऊन ही मागणी केली. त्या सभेला उत्तर देण्यासासाठी भाजपाकडून आज (मंगळवार, 10 डिसेंबर) गावात सभा घेण्यात आली. शेतकरी नेते सदाभाऊ खोत, भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर या सभेला उपस्थित होते. या सभेत बोलताना पडाळकर यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लेकीचा आणि नातवाचा राजीनामा घ्या
EVM वर संशय व्यक्त करणाऱ्या शरद पवारांनी सर्वप्रथम त्यांच्या लेकीच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा, असं आव्हान पडाळकर यांनी दिलं. तुमच्या लेकीचा राजीनामा घ्या. तुमच्या लेकीचा राजीनामा घ्या. तुमच्या कर्जत-जामखेडच्या नातवाचा राजीनामा द्या. जयंत पाटील यांचा राजीनामा घ्या. तुम्ही बळीचे बकरे आम्हाला करणार? तुम्ही व्हा.. आम्ही भिरोबाला कापतो, ' अशी टीका पडाळकर यांनी केली.
शरद पवार तुमचे प्रतिनिधी असताना कधीही तुमच्या गावात आले नाहीत. आमच्याच कोंबड्यानी बांग दिली पाहिजे हे त्यांचं 50 वर्षांपासून सुरु आहे. त्यांचा कोंबडा देवाभाऊनं कापला आहे. हे समाजाचं आंदोलन असतं तर आम्ही सरकारचा विचार केला नसता. मोहिते, पवार यांना वाटतंय आम्हीच या लोकांना गुलाम बनवून इथले राजे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणलं तेव्हा राजे आणि पोतराजे एका रांगेत आणून बसेल. तुमच्या पोटात कितीही कळा उठल्या तरी देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय. तो तुम्हाला गोळ्या देऊन नीट करेल, असंही पडाळकर म्हणाले.
( नक्की वाचा : 'शरद पवार म्हणजे मिनी औरंगजेब', दीड महिन्यात.... भाजपा नेत्याची जोरदार टीका )
2019 च्या लोकसभेत मी भाजपाचा उमेदवार होतो. माझं डिपॉझिट जप्त झालं. EVM घोटाळा असता तर माझं डिपॉझिट जप्त झालं असतं. राहुल गांधींच्या आजोळी इटलीतही EVM मधून मतदान होतं. राहुल गांधींनं मामाच्या गावाला जाऊन EVM चा अभ्यास करा, अशी टीका पडाळकरांनी केली.
जयंत पाटलांना 101 रुपयांचं बक्षीस
निवडणूक आयोगानं EVM मधील अफरातफर सिद्ध करण्यासाठी आव्हान दिलं होतं. आजवरही एकही माणूस त्याबाबत पुढे आलेला नाही. जयंत पाटील बाहेरच्या देशात शिकले आहेत. त्यांनी EVM मधील घोटाळा सिद्ध केला तर मी 50 रुपये आणि सदाभाऊ खोत 51 असे 101 रुपयांचं बक्षीस त्यांना जाहीर केलं आहे.
या देशात निवडणूक घेण्याचा अधिकार हा फक्त निवडणूक आयोग आणि त्यांच्या यंत्रणेला आहे. इतकं साधं जर शरद पवार यांना कळत नसेल तर इतके वर्ष महाराष्ट्र यांच्या ताब्यात होता. त्यांनी महाराष्ट्राची राखरांगोळी केली की नाही? असा सवाल पडाळकर यांनी विचाला. निवडणुकीच्या आधी मशिनची FLC (फर्स्ट लेव्हल चेकिंग) केली जाते. तिथं सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी बोलावले जाते. तिथं तुमच्या मतदारसंघातील एकूण मतांपैकी नुमना मतदान चेक केले जाते. हे सर्व पक्षाच्या प्रतिनिधीसमोर होते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडीला यावं, मी राजीनामा... उत्तम जानकरांच नवं आव्हान )
EVM कुणी हॅक केलं?
शरद पवार, राहुल गांधी मारकटवाडी यांना मारकडवाडीचं आकर्षण का आहे? या देशातील नागरिक 2029 साली पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणार आहे. देवाभाऊ पुन्हा पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले आहेत. तुम्हाला कितीही वाईट वाटलं तरी झाले आहेत. आमचे सर्व देव जागे आहेत. इथला बहुजन जागा आहे. ते पाहातायत. हो EVM हॅक केली पण कुणी केलं लाडक्या बहिणींनी केलं. महाराष्ट्रातल्या गरिबांनी ही मशीन हॅक केली. महाराष्ट्रातल्या कोतवालांचा, पोलीस पाटलांचा पगार वाढवला. त्यांनी मशीन हॅक केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमुळे EVM हॅक केलंय, असं त्यांनी सांगितलं.
हे राजकारण बाजूला जाऊ द्या. महाराष्ट्राला, भारताला चुकीच्या पद्धतीनं दिशा देण्याचा प्रयत्न मारकटवाडीच्या आडून केला जातोय तो हाणून पाडला पाहिजे. हा कायद्याचा देश आहे. संसदेत आणि विधानसभेत जे चालतं त्यावर देश चालतो. पवार आणि त्यांच्या बगबच्च्यांच्या सांगण्यावरुन हा देश चालत नाही. सुुप्रिया सुळे आणि राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून राजीनामा द्यावा. रोहित पवार, जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांना भेटून राजीनामा द्यावा, असं आव्हान पडाळकर यांनी दिलं.
( नक्की वाचा : विरोधी पक्षनेतेपदावरुन मतभेद! अधिकृत निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेस विरुद्ध ठाकरे संघर्ष चिघळला? )
रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका
माळशिरस विधानसभा निवडणुकीत विरोधकांना मदत करणारे भाजपा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यावरही पडाळकर यांच्यावरही पडाळकर यांनी टीका केली. 'लाज वाटत असेल तर रणजीतसिंह पाटील यांनी राजीनामा द्यावा. देवाभाऊ नसते तर तुमचं खानदान आज जेलमध्ये असते. प्रस्थापित नावाची जात महाराष्ट्रात आहे. त्यांच्या छाताडावर तुम्ही नाचायला पाहिजे. आम्ही संघर्ष करुन इथं आलेलो आहोत. आम्हाला लॉटरी लागलेली नाही. माझी भाजपाला विनंती आहे. ज्यांनी 2024 मध्ये पडत्या काळात गद्दारी केली आहे, त्यांना पायताणाच्या जवळही ठेवू नका,' असं पडाळकर म्हणाले.