राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. त्यानंतर विरोधकांनी त्यावर टिकेची झोड उठवली. आता राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवारांना अर्थ संकल्पावरून चिमटे काढले आहेत. शिवाय आगामी विधानसभे बाबतही मोठं वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. सध्या ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारां बरोबर बोलताना त्यांनी अर्थ संकल्प आणि आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवारांना शरद पवारांचे चिमटे
अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावर शरद पवार थेट बोलले आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केल्याचं ते म्हणाले. शिवाय हा अर्थसंकल्प सादर होण्या आधीच फुटल्याचंही ते म्हणाले. ज्या दिवशी तो सादर झाला त्याच्या आदल्या दिवशीच त्यात काय काय असेल हे बाहेर आले होते. अर्थसंकल्पाबाबत गुप्तता पाळायला हवी होती. मात्र तसं झाले नाही. आता ज्या तरतूदी केल्या आहेत त्या निवडणूकांसाठी आहेत असा आरोपही त्यांनी केला. हा अर्थसंकल्प म्हणजे आपण काही तरी मोठं करत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. आता या योजनांची प्रत्यक्ष अमंलबजावणी कशी होते ते पाहावे लागेल असे ते म्हणाले. शिवाय या अर्थसंकल्पामुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - LIVE : नीट पेपर फुटीचा मुद्दा विधानसभेत गाजला, सरकार कायदा आणणार
कोणाची घरवापसी होणार?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटातले अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या भेटीगाठी वाढल्याचीही चर्चा होती.अशा आमदारांना पुन्हा पक्षात घेणार का? असा प्रश्न शरद पवारांना करण्यात आला. शिवाय किती आमदार आपल्या संपर्कात आहेत अशी विचारणाही त्यांना करण्यात आली. त्यावर बोलताना किती जण आणि कोण कोण पक्षात येणार आहे याची काही कल्पना नाही. किंवा तसा कोणता प्रस्ताव नाही. असं वक्तव्य करत शरद पवारांनी सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला अटक, ते प्रकरण भोवले
'विधानसभेला मविआ बाजी मारणार'
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीत 18 जागा तर महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला. विधानसभेला हे चित्र फारसं बदलणार नाही असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. शिवाय सर्व समविचारी आणि डाव्या विचारांच्या पक्षांना बरोबर घेणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय लोकसभे प्रमाणे विधानसभेलाही मोदींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. ज्या ठिकाणी मोदींनी सभा घेतल्या त्या ठिकाणी आम्ही जिंकलो असेही ते म्हणाले. तसेच विधानसभेलाही होईल असे त्यांनी स्पष्ट केले.