'रवी राणा हे छपरी नेते, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा नाहीतर, आम्हाला बाहेर पडावं लागेल'

रवी राणा यांचा उल्लेख शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी छपरी नेते असा केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
अमरावती:

अमरावतीत महायुतीतले घमासान थांबण्याचे नाव घेत नाही. राणा विरूद्ध अडसूळ यांच्यातला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. रवी राणा यांचा उल्लेख शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी छपरी नेते असा केला आहे. शिवाय अशा नेत्यांना महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवा अशी मागणीच केली आहे. तसे झाले नाही तर आम्हाला बाहेर पडावं लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकी आधीच अमरावतीत महायुतीतलं वातावरण चांगलचं तापलं आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वादाचा मुद्दा काय? 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपालपदाचे आश्वासन दिले होते. असा दावा शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केला होता. हे आश्वासन देवून अनेक महिने झाले. पण ते पुर्ण झाले नाही. त्यामुळे आणखी काही दिवस थांबणार नाही तर सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राला पुन्हा आव्हान देणार असा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला होता. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदार संघावर दावाही त्यांनी केला होता. त्यात रवी राणा यांच्या बडनेरा मतदार संघाचाही समावेश होता. यासाठी मुख्यमंत्र्यांवरही दबाव टाकू असेही अडसूळ म्हणाले होते. शिवाय त्यांनी रवी राणा यांच्यावरही टिका केली होती. 

ट्रेंडिंग बातमी - 'लोकसभेला झालं गेलं गंगेला मिळालं, आता...' दादांचा वादा अन् आवाहनही

रवी राणा यांचा पलटवार

आनंदराव अडसूळ यांच्या वक्तव्यानंतर आमदार रवी राणा यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती. अडसूळ यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यासाठीचा खर्च आपण करू. ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांना ब्लॅकमेल करत आहेत. शिवाय नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात त्यांनी पैशांचीही मागणी केली होती असा आरोप रवी राणा यांनी केला होता. शिवाय नवनीत राणा यांना हरवण्यात अडसूळ यांचाचा हातभार लागला होता. त्यांनी संपुर्ण यंत्रणा नवनीत राणा यांच्या विरोधात लावली होती असेही राणा म्हणाले होते. त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला होता. 

ट्रेंडिंग बातमी - पवार विरहीत राजकारणाचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न ? दूरदृष्टी ठेवत दिल्ली दौऱ्याची आखणी

अभिजित अडसूळ भडकले 

रवी राणा यांच्या या आरोपामुळे माजी आमदार अभिजित अडसूळ हे चांगलेच भडकले. त्यांनी रवी राणा यांचा उल्लेख छपरी नेते म्हणून केला. शिवाय त्यांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणीही केली. त्यांना स्थानिक भाजपनेत्यांचाही विरोध आहे असेही ते म्हणाले. तर त्यांना महायुतीतून बाहेर काढले नाही तर आम्हाला बाहेर पडावे लागेल असा इशाराही त्यांनी देवून टाकला. रवी राणा यांनी ज्या शब्दांचा वापर केला आहे तो असंसदीय आहे. त्यांचे वक्तव्य हे बालिशपणाचे आहे. दरम्यान नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आपल्याला मान्य नाही. त्या विरोधात अपिल करण्याचा अधिकार आहे. तो आपण करू असे ही अडसूळ यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? जयंत पाटलांचं थेट उत्तर

राज्यपालपदाबाबत दिले होते पत्र 

यावेळी अभिजित अडसूळ यांनी अमित शाह यांनी राज्यपालपदा बाबत दिलेल्या आश्वासनाचे पत्र ही दाखवले. त्यामुळे रवी राणा यांनी जो ब्लॅकमेल करण्याचा आरोप केला आहे तो खोटा आहे असे अडसूळ यांनी सांगितले. अमरावती लोकसभा लढू नये असे भाजपने आनंदराव अडसूळ यांना सांगितले होते. जर अडसूळ निवडणूक लढले असते तर खासदार झाले असते. पाच वेळा ते लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. यावेळी जिंकले असते तर केंद्रात मंत्री असते असा दावा अभिजित अडसूळ यांनी यावेळी केला. राणा यांच्यामुळेच अमरावतीला मंत्रीपद मिळण्याची संधी हुकली असा आरोपही त्यांनी केला.       

Advertisement