Bhaskar Jadhav: '...तर माझ्यात काही तरी दोष', भास्कर जाधवांचे निवृत्तीचे संकेत

भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

राकेश गुडेकर 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्याला कारण ही तसेच आहे. त्यांनी नुकताच एक शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली. मला काम करण्याची संधी कमी मिळते. याचा अर्थ माझ्यात काहीतरी दोष आहे. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपण जी हुजूर जी हुजूर असं करत कोणाच्या पाठी मागे फिरत नाही. असं म्हणत शिवसेनेत अशी काही पद्धत सुरू आहे का? याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 जाधव पुढे म्हणाले की चूक असेल तर चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो. त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर याचं मला दुःख वाटण्याचं कारण नाही, असं  ही भास्कर जाधव यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात आपल्याला मंत्रिपद मिळायला हवं होतं. हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन असं ते म्हणाले. पण मंत्रीपद नाही मिळालं म्हणून रडत बसायचं आहे का, लढत राहायचं याचाही आपण विचार करतो. नाही मिळालं म्हणून मी काय रुसून बसलो नाही. मी लढतोय, पण नाही मिळालं ते बोललं ते चुकीचं काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.  

ट्रेंडिंग बातमी - Iran Israel War: पाकिस्तानने रंग बदलले, अमेरिकेलाच सुनावले, इराणवरील हल्लाबाबत मोठं वक्तव्य

भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा. यापेक्षा वेगळं काही कारण नाही असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले. चिपळूणमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखाप्रमुखांसाठी मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते.  शिवसेनेची  खरी ताकद म्हणजे शिवसेनेचा शाखाप्रमुख आहेत. मात्र  शिवसेनेचा शाखाप्रमुख सध्या प्रवाहातून बाजूला झाल्यासारखा वाटत आहे.  त्यामुळे केवळ शाखाप्रमुखांची फळी भक्कम करण्यासाठी हे शिबिर घेण्यात आलं असं ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune Palkhi 2025 Live Check : फुरसुंगी फाट्यावर तुकाराम महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत

शरद पवारांची मी साथ सोडली यात मला अजिबात चुकल्यासारखं वाटत नाही. पण मी घेतलेला निर्णय हा चुकीचा होता हे मी स्पष्टपणे बोललो होतो. मला याची खंत वाटते असं अजिबात नाही, असं पुन्हा एकदा भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल भास्कर जाधव यावेळी म्हणाले की, संजय राऊत हे माझे ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आहेत. पक्षात जेष्ठ नेते असताना आपल्याला त्यांच्या आधी भाषणाची संधी दिली जाते हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. 

Advertisement