ना जागा वाटप ना चर्चा! तरीही शिंदेंच्या शिलेदाराने घोषित केली स्वत:ची उमेदवारी

चिपळूणमध्ये नुकताच शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा झाला. हा मेळावा गाजवला तो उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी. मागील निवडणुकीत सदानंद चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी पराभव केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. त्यामुळे कोणाच्या वाट्याला कोणता मतदार संघ जाणार हे अजूनही दुलदस्त्यात आहे. असं असलं तरी इच्छुकांनी मात्र आपली तयारी जोरदार पणे सुरू केली आहे. मग तो मतदार संघ कोणाच्याही वाट्याला जावो उमेदवार आपणच असणार असेच ते छातीठोक पणे सांगत आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिपळूण विधानसभा मतदार संघातही आता तशीच स्थिती निर्माण झाली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चिपळूणमध्ये नुकताच शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा झाला. हा मेळावा गाजवला तो उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी. मागील निवडणुकीत सदानंद चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी पराभव केला होता. त्यानंतर काही काळ ते राजकारणापासून वेगळे झाले होते. पण शिवसेनेत फुट पडण्यानंतर चव्हाण यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. तर त्याच वेळी राष्ट्रवादीतही फूट पडली. शेखर निकम यांनी अजित पवारांना साथ देण्याचे ठरवले. त्यामुळे हे दोन्ही नेते सध्या महायुतीतचा भाग आहे. त्यामुळे चिपळून विधानसभेसाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Maratha Reservation : 'आमच्या आंदोलनाचा शेवट शरद पवारांच्या घरावर'; फडणवीसांच्या भेटीनंतर केरेंचा हल्लाबोल

सदानंद चव्हाण यांनी चिपळूणमधून आपणच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आपण धुनष्य बाण चिन्हावर निवडणूक लढू असेही सांगून टाकले आहे.  मी धनुष्यबाणा बरोबरच आहे. धनुष्यबाणाबरोबरच राहणार आणि धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणार अशी घोषणा सदानंद चव्हाण यांनी केली आहे. तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी मलाच मिळेल अशी खात्री आणि आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एक प्रकारे त्यांनी आपली उमेदवारीच जाहीर करून टाकली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Sheikh Hasina शेख हसीनांना भारत मदत करणार की नाही ? परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम हे सध्या चिपळूण विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे ज्याचा आमदार त्याची जागा या तत्वानुसार पहिला दावा हा शेखर निकम यांचा असणार आहे. निकम यांनी आगामी विधानसभेसाठी मतदार संघात तयारीही सुरू केली आहे. अशात सदानंद चव्हाण यांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या जागेवरून महायुतीत घमासान होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदार संघात भास्कर जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही लढत सोपी असणार नाही हे स्पष्ट आहे.  

Advertisement