'कदम- चव्हाणांनी रस्तावर उतरून 'दम' दाखवावा' भास्कर जाधवांनी डिवचले

कदम आणि चव्हाण हे महायुतीतील मोठे नेते आहे. मात्र सध्या त्यांच्यातच जुंपली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही ठिक नसल्याचेच दिसून येत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नांदेड:

कोकणात सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजप मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे विधानसभेच्या रणधुमाळी आधीच कोकणात राजकीय शिमगा पाहायला मिळतोय. कदम आणि चव्हाण हे महायुतीतील मोठे नेते आहे. मात्र सध्या त्यांच्यातच जुंपली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही ठिक नसल्याचेच दिसून येत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या दोघांना डिवचले आहे. आता फक्त शाब्दीक चकमकी नकोत. दोघांनीही रस्त्यावर एकमेका समोर उभं ठाकलं पाहीजे. त्यानंतर कोणाच्यात दम आहे हे दाखवून दिलं पाहीजे असं आव्हानच जाधव यांनी या दोघांना दिले आहे. जाधव हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रामदास कदम यांनी या आधीही रविंद्र चव्हण यांना  लक्ष केलं होतं. चव्हाण यांचा आपल्या मतदार संघात त्रास होत आहे. शिवाय आता मुंबई गोवा महामार्गावरूनही चव्हण यांना कदम यांनी लक्ष केलं आहे. शिवाय त्यांच्या विरोधात आंदोलन ही पुकारलं आहे. या सर्व गोष्टींवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी तोंडसुख घेतलं आहे. महायुतीमध्ये सर्व काही ठिक नाही. दोन्ही नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. यांचे वाकयुद्ध जनता पाहात आहे. मात्र आता तोंडी भांडत बसण्यात अर्थ नाही. अशा वेळी त्यांनी एकमेकांना दम दाखवावा असे आव्हानच जाधव यांनी दिले आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  Video : बदलापूर पुन्हा हादरलं! बापाचं निर्घृण कृत्य, लेक-पत्नी बसलेल्या गाडीला समोरून जोरदार धडक 

 यावेळी जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली. त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. नागपूर हे क्राईम कॅपिटल बनले आहे. त्यांचा पोलीस खात्यावर वचक राहीलेला नाही. फडणवीस हे पोलीसांचे प्रवक्ते असल्या सारखे बोलतात असा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला. बदलापूर इथं झालेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेला पोलीस खातेच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. गुन्हेगारांना कोणताही धाक राहीलेला नाही असेही ते यावेळी म्हणाले. फडणवीसांच्या कार्यकाळात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. ते पोलीसांचा वापर केवळ विरोधकांना जेरीस आणण्यासाठी करत आहेत असा आरोपही जाधव यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - अकोल्यातील ZP शाळेतील आठवीतील विद्यार्थिंनींसोबत संतापजनक कृत्य, शिक्षकाचे सहाजणींना...

मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गट किती जागा लढवणार आहे, याचा आढावा भास्कर जाधव यांनी घेतला आहे. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पक्षश्रेष्ठींना याबाबत अहवाल देणार असल्याचेही ते म्हणाले. ज्या जागा या आधी जिंकल्या आहेत त्यावर शिवसेनेचा दावा असल्याचेही ते म्हणाले. शिवाय महाविकास आघाडीचे जागा वाटप लवकर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.  

Topics mentioned in this article