जाहिरात

telangana tunnel collapse : बोगद्यात गुडघ्यापर्यंत चिखल, 24 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू; 8 मजुरांना बाहेर काढण्याचं मोठं आव्हान

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बोगद्यात 50 मजूर काम करीत होते. 42 मजूर सुरक्षित बाहेर कसे आले?

telangana tunnel collapse : बोगद्यात गुडघ्यापर्यंत चिखल, 24 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू; 8 मजुरांना बाहेर काढण्याचं मोठं आव्हान

Telangana tunnel collapse : तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यात श्रीशैलम बोगदा कालवा प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्याच्या छताचा काही भाग कोसळल्याने आठ कामगार आत अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हे मजूर बोगद्यापासून 13.8 किलोमीटर आत अडकले आहेत.  आज रविवारी 23 फेब्रुवारी सकाळी श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) बोगद्यातील बचाव कार्याला मोठा धक्का बसला आहे. बोगद्यात गुडघ्यापर्यंत चिखल आहे, त्यामुळे SDRF आणि NDRFच्या पथकांना बोगद्याच्या कोसळलेल्या भागापर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुसरीकडे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी इतर अनेक प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी तेलंगणाचे पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी म्हणाले की, गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये अशाच एका घटनेत अडकलेल्या कामगारांची सुटका केली होती. राज्य सरकार त्यातील तज्ज्ञांची मदत घेत आहे. 

Maharashtra Karnataka dispute : महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद; काय आहे प्रकरण?

नक्की वाचा - Maharashtra Karnataka dispute : महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद; काय आहे प्रकरण?

कशी झाली दुर्घटना?
शनिवारी सकाळी टनल बोरिंग मशीनसह बोगद्यात 50 हून अधिक लोक काम करीत होते. ते बोगद्यात 13.5 किलोमीटरपर्यंत पोहोचले होते. यादरम्यान बोगद्यात पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने बोगद्याच्या छताचा भाग कोसळला. यादरम्यान मशीनच्या पुढे असलेल्या दोन इंजिनियरसह सहा मजूर अडकले. तर 42 कर्मचारी बोगद्याच्या बाहेरच्या दिशेने धावले आणि सुरक्षित बाहेर पडले.