जाहिरात

Shiv sena UBT: राजन साळवी उद्धव ठाकरेंना भेटले, दोघात बंद दाराआड काय चर्चा झाली?

उद्धव ठाकरें बरोबर जवळपास पाऊण तास ही बैठक झाली. यात तालुका प्रमुख,मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख होते.

Shiv sena UBT: राजन साळवी उद्धव ठाकरेंना भेटले, दोघात बंद दाराआड काय चर्चा झाली?
मुंबई:

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज आहेत. त्यांनी मतदार संघात कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला होता. त्यात तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत आहे असा सुर होता. त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय असं राजन साळवी यांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली. मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेत नक्की काय झालं याचा तसशील आता बाहेर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजापूर लांजा विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला. या पराभवाला शिवसेनेचे वरिष्ठ नेते जबाबदार असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला. त्यांचा रोख माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे होता. याबाबत आपण उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानुसार मातोश्रीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत खडाजंगी झाल्याचं समजतंय. 

ट्रेंडिंग बातमी - तक्रारदार तरुणीला बाथरूममध्ये नेलं, पँटची चेन उघडली आणि..पोलीस अधिकाऱ्याचे धक्कादायक कृत्य

उद्धव ठाकरें बरोबर जवळपास  पाऊण तास ही बैठक झाली. यात तालुका प्रमुख,मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख होते. राजन साळवींनी विनायक राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं. उद्धव ठाकरेंकडे राऊत यांच्या विरोधात तक्रारींचा पाडा वाचला. शिवाय आपला पराभव कसा केला गेले हेही त्यांनी सांगितलं. राजन साळवींच्या तक्रारीनंतर  उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का ? असा उलट प्रश्न विचारला.

ट्रेंडिंग बातमी - Mukesh Chandrakar: भ्रष्टाचार उघड करणारे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या, मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकला

त्यावर राजन साळवींनी विनायक राऊतांना 21 हजाराचा लीड दिल्याचं स्पष्ट केलं.त्यामुळे मी जबाबदार कसा ? असं उलट प्रश्न साळवी यांनी ठाकरेंना केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या म्हणण्यानुसार  आता काय करायचं? विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू ? असा सवाल त्यांनी केला. त्यावर राजन साळवी यांनी तो आपला निर्णय आहे असं उत्तर दिल्याचं समजत आहे. विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुखांचे  उदय सामंत, किरण सामंत यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचा आरोप यावेळी साळवी यांनी केला.