दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मिळावे! अर्ज कोणी केला? ठाकरे की शिंदे गटाने?

यावर्षीच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्यात यावे यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर गणेशोत्सवानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

शिवसेना आणि दसरा मेळावा हे समिकरण झाले आहे. बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्याला याच शिवाजी पार्कमधून शिवसैनिकांना संबोधित करत होती. ही परंपरा अखंड पणे सुरू होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत होते. पण शिवसेनेत फुट पडली. दोन गट निर्माण झाले. एक शिवसेना ठाकरेंकडे तर दुसरी शिवसेना शिंदेंकडे राहील. दोन दसरे माळावे होवू लागले. आता यावर्षीच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्यात यावे यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर गणेशोत्सवानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई महापालिकेकडे सादर करण्यात आलेला अर्ज हा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे असे अर्जात म्हणण्यात आले आहे. शिवाय अर्जासोबत मागील आठ महिन्यात तीन स्मरणपत्र ही जोडण्यात आली आहेत. ठाकरे गटाने अर्ज केला असला तरी शिंदे गटाने अजूनही अर्ज केला नसल्याची सुत्रांची माहिती आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Lalbagh Raja : लालबाग राजा मंडळ पुन्हा एकदा वादात; धक्कादायक 3 Video, नागरिकही संतापले!

दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी काही महिन्याआधीच अर्ज करण्यात आला आहे. हा अर्ज शिवसेना ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांनी केला आहे. शिवाय स्मरणपत्र ही त्या बरोबर जोडली आहेत. दरम्यान या अर्जावर गणेशोत्सवनंतर मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे. त्यावरून परवानगी द्यायची की नाही हे ठरेल. 

ट्रेंडिंग बातमी - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर! केंद्र सरकारचा निर्यात शुल्काबाबत मोठा निर्णय

18 सप्टेंबरनंतर  मुंबई महापालिका परवानगी संदर्भात योग्य तो निर्णय घेईल. त्याची माहिती संबंधित अर्जदाराला देण्यात येईल असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी कोणताही अर्ज आला नसल्याचे सुत्रांकडून समजते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला  दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं याची प्रतिक्षा आहे.