
दोन शिवसेना दोन दसरा मेळाले असं चित्र मुंबईत पुन्हा एकदा पाहायला मिळालं. एका मेळावा होता उद्धव ठाकरे यांचा. हा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. तर दुसरा मेळावा होता शिवसेना शिंदे गटाचा तो मेळावा गोरेगाव इथं झाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा दसरा मेळावा दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाचा होता. त्यामुळे जास्ती जास्त गर्दी जमवण्याची चढाओढ दिसून आली. ठाकरेंचा दसरा मेळावा भर पावसात पार पडला. तर शिंदेंचा दसरा मेळावा गोरेगावमध्ये बंदीस्त नेस्को सेंटरमध्ये पार पडला. त्याच वेळी कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होती याची चर्चा सुरू झाली आहे.
दसरा मेळाव्यात खरे पाहाता मैदान भरण्यासाठी दोन्ही शिवसेनेनं मेहनत घेतली. ती मेहनत दिसूनही आली. शिवाजी पार्कवर पाऊस असतानाही शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पावसातही शिवसैनिक बसून मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकत होते. तर दुसरीकडे शिंदेंच्या मेळाल्यात गोरेगावचे नेस्को सेंटर खचाखच भरले होते. त्यामुळे जमिनीवरची लढाईत दोन्ही शिवसेनेने एकमेकांना तुल्यबळ अशी टक्कर दिली. जास्तीत जास्त गर्दी जमवल्याचे दिसले. पण खरी लढाई ही सोशल मीडियावर होती. सोशल मीडियावर या दोन्ही मेळाव्या पैकी कोणत्या मेळाव्याला अधिक गर्दी आणि पसंती मिळाली याचे आकडे समोर आले आहेत.
दोन्ही मेळाले शिवसेनेनं आपापल्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह केले होते. मेळावा सुरू होण्याच्या दोन तास आधी त्याचे लाईव्ह प्रसारण केले जात होते. तसं पाहात शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आधी सुरू झाला. उद्धव ठाकरे साधारण पणे आठ वाजता शिवाजी पार्कवर आले. त्याआधी पासून यु ट्यूबवर लाईव्ह प्रसारण सुरू होते. उद्धव ठाकरे आले त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा जवळपास 12 हजार लोक एकाच वेळी पाहात होते. त्यावेळी संजय राऊत यांचे भाषण सुरू होते. संजय राऊत यांचे भाषण संपल्यानंतर उद्धव ठाकरे भाषण करण्यास उभे राहीले. त्यावेळी हा आकडा पटकन वाढला. 12 हजार हून थेट 13 हजार 700 जण उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत होते. ठाकरे यांनी जवळपास पाऊण तास भाषण केले. त्यांच्या या भाषणा दरम्यान साधारण पणे 13 हजार लोक हे भाषण सतत पाहाताना आढळले. तो आकडा कमी झाला नाही. भाषण संपल्याच्या तीन तासानंतर जवळपास 1 लाख व्ह्यूज या लाईव्हला आले होते.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होता. हा मेळालाही शिंदे यांचे भाषण सुरू होण्याच्या दोन तास आधी युट्यूबवर लाईव्ह होता. शिवसेना नेते रामदास कदम भाषण करत होते. त्या आधी सुरूवातीला 5 हजार जण हे लाईव्ह पाहात होते. पण ज्यावेळी रामदास कदम भाषणाला उभे राहीले त्यावेळी हा आकडा एकदम वाढला. तो जवळपास 52 हजारावर गेला. ठाकरे गटाच्या तुलनेत हा खुप जास्त होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणाला उभे राहीले. त्यानंतर हा आकडा आणखी वाढला. 52 हजरात वाढ होवून 52 हजार 700 जण शिंदेंचे भाषण ऐकत होते. पण पुढच्या दहा मिनिटात हा आकडा घसरला. तो 49 हजारावर गेला. पण नंतर पुन्हा एकदा लाईव्ह पाहाणाऱ्यांची संध्या वाढतच गेली. कधी 56 हजार, तर कधी 55 हजार वर लाईव्ह पाहिलं जात होते. नंतर57 हजार ही ते झालं. सर्वाधिक 59 हजाराचा आकडाही युट्यूबवर शिंदेंच्या भाषणा वेळी गाठला गेला होता. पण शेवटी शेवटी तो घसरला आणि 54 हजारावर आला. शिंदे गटाचे लाईव्ह स्ट्रीम संपल्यानंतर दोन तासात त्या लाईव्हला दहा हजारच्या आसपास व्हिज्यू आले होते. जसा वेळ जाईल तसे या व्ह्यूजमध्ये ही वाढ होईल. पहिल्या दोन तासाचे हे आकडे समोर आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world