जाहिरात

Sambhajinagar News: शिंदे गटातील संघर्ष तीव्र! संभाजीनगर हादरलं, स्वतःच्याच नेत्याच्या फोटोला मारले जोडे

या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि शिंदे गटातील गटतट आता उघडपणे समोर आले आहेत.

Sambhajinagar News: शिंदे गटातील संघर्ष तीव्र! संभाजीनगर हादरलं, स्वतःच्याच नेत्याच्या फोटोला मारले जोडे
  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शिंदे गटात वाद
  • उपमहापौर जंजाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराज कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात जोडे मारो आंदोलन केले
  • विनोद बनकर यांनी जंजाळ यांच्यावर जातीवादाचा आरोप केला आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
छत्रपती संभाजीनगर:

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटातील अंतर्गत वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. आज क्रांती चौकात संतप्त पदाधिकाऱ्यांनी आपल्याच नेत्याविरोधात 'जोडे मारो' आंदोलन केले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील अंतर्गत गटबाजीने आता हिंसक वळण घेतले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. शुभम काळे यांच्या निवडीनंतर निष्ठावंत कार्यकर्ते विनोद बनकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. 

उपमहापौर जंजाळ हे जातीवाद करत असल्याचा आरोप बनकर यांनी केला आहे. त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. या प्रकारामुळे शिंदे सेनेची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महानगरपालिकेत शिंदे गटातर्फे शुभम काळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. मात्र, या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत पदाधिकारी कमालीचे नाराज झाले आहेत. या पदासाठी इच्छुक असलेले विनोद बनकर यांनी या निवडीला जाहीर विरोध केला असून, पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

नक्की वाचा - Pune News: भाजप नेत्यांचा 'सेल्फ गोल'! काँग्रेसचा निषेध करायला आले पण भाजप विरोधातच नारे दिले, काय घडलं?

या वादाच्या केंद्रस्थानी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आहेत. विनोद बनकर यांनी थेट त्यांच्यावरच निशाणा साधला आहे. जंजाळ हे कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव करत असून ते 'जातीवादी' वागणूक देत असल्याचा खळबळजनक आरोप बनकर यांनी केला आहे. निष्ठावंतांना डावलून मर्जीतल्या माणसांना पदे दिली जात असल्याचा दावा यावेळी आंदोलकांनी केला. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी विनोद बनकर आणि त्यांच्या समर्थकांनी आज दुपारी क्रांती चौकात जंजाळ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामुळे शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.  आगामी काळात हा वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

नक्की वाचा - Kalyan News: डान्सबार गर्ल ते ड्रग्ज सप्लायर! अलिशान घरातून 6 कोटींचे ड्रग्ज जप्त, घरातून चालवत होती रॅकेट

या निमित्ताने शहरात शिंदे गटात मोठी ठिणगी पडली असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळे यांना संधी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इच्छुक उमेदवार विनोद बनकर यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर जातीवादाचा आरोप करत क्रांती चौकात जोरदार आंदोलन केले. "पक्षात निष्ठावंतांना किंमत उरली नाही," अशा घोषणा देत जंजाळ यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि शिंदे गटातील गटतट आता उघडपणे समोर आले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com