मतदारसंघात नाही पत आणि माझे नाव गणपत! शिंदेंची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

शिवसेना (उबाठा) ही चायनीज छत्रीसारखी असून त्यांची अवस्था आज इधर, कल उधर; परसो और किधर अशी झाली असल्याचे शिंदे यांनी टीका करताना म्हटले. 

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनांनी 58 वा वर्धापन दिन साजरा केला. शिवसेना (उबाठा) चा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता तर शिवसेनेचा (शिंदे गट) वर्धापन दिन वरळीच्या NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आला होता.  शिवसेनेच्या (शिंदे गट) वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतान एकनाथ शिंदे यांनी शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) ला मिळालेलं यश ही तात्पुरती सूज असल्याचे म्हणताना शिंदे यांनी ही सूज उतरवण्यासाठी हिंदुत्वाचा झेंडू बाम लावण्याची गरज असल्याचे म्हटले. 

आपला विजय ठासून आलेला विजय!

एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुबाबत बोलताना म्हटले की, शिवसेनेने त्यांचे बालेकिल्ले शाबूत राखण्यात यश मिळवले. ते म्हणाले की, "ठाणे, कल्याणमध्ये 2 लाखांपेक्षा अधिकच्या मतांनी जिंकलो. संभाजीनगर जिंकले, कोकणात एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. हा विजय घासून पुसून नाही तर ठासून मिळवलेला आहे.  २ वर्षांपूर्वी केलेल्या उठावावर जनतेने शिक्कामोर्तब केलंय."

Advertisement

'नियती कोणालाही माफ करत नाही'

रवींद्र वायकरांच्या विजयानंतर शिवसेना उबाठाने त्यावर आक्षेप घेतला आहे. मोबाईलच्या माध्यमातून ईव्हीएम मशिन हॅक केल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांना शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिले. शिंदे यांनी म्हटले की, "वायकरांचा विजय त्यांच्या फार जिव्हारी लागला आहे. आम्ही जिंकलेलो असताना वायकर यांना हरवण्याचे काम करत असताना मी डोळे बंद करून पाहात राहू का ? वायकरांचा विजय हा जनतेचा विजय आहे, मेरीटवर मिळालेला विजय आहे. कुठेही जा, कधीही जा हा विजय जनतेने दिलेला विजय आहे. हा शिवसेनेचा विजय आहे. नियती कोणालाही सोडत नाही, कोणालाही माफ करत नाही. "

Advertisement

ही कुठली लोकशाही?

 ईव्हीएम जर हॅक झाले असते तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळेंचाही विजय झाला नसता का ? असा सवाल शिंदे यांनी विचारला. ते म्हणाले की, "धारावी, ट्रॉम्बेमध्ये राहुल शेवाळेंचा लीड गेला. 1 टक्का मते आपल्याला आणि 99 टक्के मतदान त्यांना. इथे कुठला मोबाईल लावून त्यांनी ईव्हीएम हॅक केलं होतं? ही कुठली लोकशाही? आता आम्हीही ईव्हीएमवर संशय घ्यायचा का ? तुम्ही जिंकला की ईव्हीएम चांगले, नाहीतर वाईट?"

मतदारसंघात नाही पत आणि माझे नाव गणपत!

शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन हा वरळीमध्ये साजरा करण्यात आला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे या मतदारसंघाचे आमदार असून शिंदे यांनी नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली. शिंदे यांनी म्हटले , की काही म्हणत होते की इथे आम्ही 50 हजारांचा लीड घेणार मात्र वरळीत शिवसेना (उबाठाला) जेमतेम 6 हजारांचा लीड मिळाला. एक जण आम्ही इथून लढू, तिथून लढू असे आव्हान देत होते, आता त्यांना तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. त्यांची अवस्था ही  मतदारसंघात नाही पत आणि माझे नाव गणपत अशी झाली असल्याचे म्हणत शिंदे यांनी टीका केली.  उबाठा ही चायनीज छत्रीसारखी असून त्यांची अवस्था आज इधर, कल उधर; परसो और किधर अशी झाली असल्याचे शिंदे यांनी टीका करताना म्हटले. 

Advertisement

त्यांची सूज उतरवण्यासाठी हिंदुत्वाचा बाम लावा

शिंदे यांनी आपल्या भाषणातून शिवसेना उबाठावर सडकून टीका केली. खोट्या प्रचाराची दुर्गंधी लगेच पसरते, त्यामुळे आपल्याला विकासाचा सुगंध पोहचवावाच लागणार आहे असे शिंदे यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीतील मिळालेले यश ही त्यांना आलेली सूज असून ती उतरवण्यासाठी हिंदुत्वाचा झेंडू बाम लावायची वेळ आली आहे अशा शब्दात शिंदे यांनी टीका केली. 

Topics mentioned in this article