उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईतील महिला नगरसेवक शिंदें गटाच्या गळाला, सेना भवनात काय घडलं?

मुंबई महापालिकेत महापौर विराजमान होण्याआधीच घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉ.सरिता म्हस्के शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची माहिती समोर आलीय. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Shivsena UBT Corporator Dr Sarita Maske
मुंबई:

देवेंद्र कोल्हटकर, प्रतिनिधी

BMC Election 2026 Shivsena UBT Latest News :  मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अवघ्या 65 जागा जिंकता आल्याने त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मगाली तीन दशकांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने 118 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. परंतु, आता महापौरपदावरून महायुतीत विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई महापालिकेत महापौर विराजमान होण्याआधीच घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉ.सरिता म्हस्के शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची माहिती समोर आलीय. 

एक नगरसेवक वगळता ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक नवी मुंबईकडे रवाना

म्हस्के आजच्या सेना भवनातील बैठकीला डॅा सरिता म्हस्के गैरहजर असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत. परंतु,सरिता म्हस्के सेना भवनातील बैठकीत गैरहजर असल्याने ठाकरेंच्या गोटात खळबळ उडाली आहे. सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही शिवसेना ठाकरे गटाकडून सुरु आहे. 

नक्की वाचा > शिंदेंना शह देण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी, उद्धव ठाकरेंनी केला CM फडणवीसांना संपर्क? पाहा व्हिडीओ

शिवसेना (UBT) एकूण नगरसेवकांची संख्या 64 वर आहे. 

डॉ. रवींद्र म्हस्के आणि डॉ.सरिता म्हस्के हे दाम्पत्य काँग्रेसमध्ये (चांदीवली) येथे कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीत मस्के दाम्पत्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि एबी फॉर्म मिळवला. महत्त्वाचे म्हणजे ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी त्यांना एबी फॉर्म मिळाला आणि चांदीवली प्रभाग क्रमांक 157 मधून डॉ. सरिता म्हस्के यांनी ठाकरे गटातून निवडणूक लढवून विजय मिळवला. निवडणूक प्रचारा दरम्यान स्वतः उद्धव ठाकरेंनी चांदीवली इथे डॉ.सरिता म्हस्के यांच्यासाठी प्रचार करत त्यांना निवडून देण्याच आवाहन स्थानिकांना केलं होतं. 

नक्की वाचा >> Car Safety Tips : कार पाण्यात पडल्यावर काय करावं? बुडण्याआधीच 'या' 6 गोष्टी तातडीनं करा, तुमचा जीवही वाचू शकतो