'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारीला ते लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या बरोबर एनडीटीव्ही मराठीने EXCLUSIVE बातचीत केली आहे. मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला घवघवीत यश मिळाले. 10 पैकी ०8 उमेदवार निवडून आले. तर काही उमेदवार हे तुतारी आणि पिपाणीच्या गल्लतीमुळे पराभूत झाले. या मिळालेल्या यशानंतर राशपचे नेते उत्साहात आहेत. लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारीला ते लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या बरोबर एनडीटीव्ही मराठीने EXCLUSIVE बातचीत केली आहे. मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले रोहीत पवार? 

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना विवीध अमिष दाखवण्यात आली. त्याला काही नेते बळी पडले अशी धक्कादायक माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. या सर्वांची माहिती आपल्याकडे आहे. ती पुराव्यासह सर्वांसमोर ठेवू असेही त्यांनी सांगितले. मात्र हे नेते कोण होते हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. ज्या पक्षानेत कुटुंब फोडली. पक्ष फोडले. त्याच भाजपने निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. स्थानिक नेत्यांवर दबाव टाकला. मोदींची सत्तात येईल. त्यामुळे भविष्यात आपल्यालाही काही फायदा होईल असा विचार करणारा एक गटही विरोधकांमध्ये होता. असे नेते रात्रीच्या अंधारात जावून भाजपच्या नेत्यांना भेटत होते असेही ते म्हणाले. काहींनी ऐडजेस्टमेंट केली. काहींना मॅनेज केले गेले. त्यांना पैसेही पुरवले. हे करत असताना गुंडांचा सर्रास वापर झाला. त्यांना प्रचारात वापरले गेले. त्यांच्या माध्यमातून अनेकांना धमकावले गेले असा आरोपही रोहीत यांनी केला.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - रोहित पवारांना पक्षसंघटनेतील कुठल्या पदाची अपेक्षा? NDTV मराठीच्या EXCLUSIVE मुलाखतीत स्पष्टच सांगितलं

   
'संघटनेत होतकरू तरूणांना संधी द्या' 

पक्षात अनेक होतकरू तरूण आहेत. त्यांना पक्षात योग्य संधी देण्याची गरज आहे. त्यांना वेगवेगळी पदे दिल्यास त्याचा पक्षाला फायदा होईल असे मतही रोहित पवार यांनी व्यक्त केले. संघटनेतल्या काही सेलमध्ये बदल करावे लागतील. हे बदल अचानक जरी करता येत नसतील तरी ते टप्प्याटप्प्याने करावेत. हे करत असताना अनुभवी लोकांना विश्वासात घेतले जाईल. त्यासाठी आम्ही काही गोष्टी सुचवू असेही रोहित पवार म्हणाले. जर हे बदल झाले तर पक्षा मजबूत होण्यास मदत होणार आहे.  शरद पवारांच्या नेतृत्वात एक नवी फळी उभी राहात आहेत. ज्यांच्यावर आरोप झाले ते सर्व आता एका बाजूला गेले आहेत. त्यामुळे ज्यांनी अडचणीच्या वेळी साथ दिली. निष्ठा दाखवली अशा कार्यकर्त्यांना आता पुढे आणण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. 

Advertisement

'जयंत पाटलां बरोबर मतभेद नाहीत'

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बरोबर आपले कोणतेही मतभेद नाही असे रोहीत पवार यांनी स्पष्ट केले आहे. काही तरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मी पक्षाच्या वाढीसाठी बोलत आहे. पक्षाला नुकसान होईल अशी कोणतीही कती आता पर्यंत केली नाही. या पुढेही करणार नाही. आक्रमक पणे काम करण्याची आपली स्टाईल आहे. त्यातून काही चुकीचे बोललो असेल तर चुक दाखवून द्यावी ते सुधारली जाईल असेही त्यांनी सांगितले. मात्र संघटनेत बदल झाले पाहीजे या भूमीकेवर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement

किंगमेकर कोण? 

लोकसभेत मिळालेल्या यशाचे श्रेय कोणाचे आहे या प्रश्नालाही रोहित पवार यांनी थेट उत्तर दिले. राष्ट्रवादीला जे यश मिळाले त्याच सर्वाच मोठा वाटा हा सामान्य जनतेचा आहे. त्यांनी निर्धार केला आणि भाजपचा पराभव केला असे ते म्हणाले. सामान्य कार्यकर्त्यावर खूप दबाव होता अशा स्थितीत त्याने बुथ सांभाळला. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हे श्रेय असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय शरद पवारांनी या वयात ही घेतलेल्या मेहनतीलाही तोड नाही. त्यामुळे मोठे श्रेय हे शरद पवारांचे असल्याचेही रोहीत पवार यांनी स्पष्ट केले आहे.