
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना शिमलामधील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी डिसेंबर 2024 मध्ये वयाची 78 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांना तपासणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांचे मुख्य सल्लागार (मीडिया) नरेश चौहान यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, 'किरकोळ समस्यां'मुळे त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे.
( नक्की वाचा : 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीसांनी दिलं उत्तर )
ते म्हणाले की, 'काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही किरकोळ आरोग्य समस्यांमुळे नियमित आरोग्य तपासणीसाठी शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आले आहे.'
'डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अधिक तपशील प्रतीक्षेत आहे,' असंही चौहान यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world