Congress Leader Writes Fiery Letter to Sonia Gandhi : काँग्रेसच्या एका माजी आमदाराने थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाची'ओपन-हार्ट सर्जरी' (Open-Heart Surgery) आणि 'सखोल रचनात्मक व वैचारिक नूतनीकरण' करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पक्षाच्या 'शतकानुशतके जुन्या वारसा'चे नुकसान बाहेरील प्रतिस्पर्ध्यांमुळे नव्हे, तर 'पक्षाच्या अंतर्गत निर्णयामुळे' होत असल्याचा गंभीर इशारा दिला आहे.
काय आहे तक्रार?
ओडिशातील बारबाटी-कटकचे माजी आमदार मोहम्मद मोकीमयांनी हे 5 पानी पत्र 8 डिसेंबर रोजी पाठवले आहे. कनिष्ठ न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्यांना 2024 ओडिशा निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यांनी या पत्रातून ओडिशातील सलग 6 पराभव आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या सलग 3 पराभवांबद्दल खंत व्यक्त केली आहे. तसेच 2024 पासून बिहार, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या पराभवांचाही उल्लेख केला आहे.
राहुल गांधींची भेट मिळत नाही
मोकीम यांच्या तक्रारींच्या यादीत, राहुल गांधी यांच्या भेटीसाठी त्यांना 'जवळपास 3 वर्षांपासून' वेळ न मिळाल्याचा मुद्दाही समाविष्ट आहे. पत्राची एक प्रत राहुल गांधी यांनाही पाठवण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, "ही माझी वैयक्तिक तक्रार नाही... तर देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये पसरलेल्या व्यापक भावनात्मक तुटलेपणाचे हे प्रतिबिंब आहे, ज्यांना वाटतं की त्यांना 'दुर्लक्षित' आणि 'ऐकले गेले नाही'."
( नक्की वाचा : Shivraj Patil : अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्यानं झाला होता शिवराज पाटालांचा लातूरमध्ये विजय )
भावी नेतृत्वासाठी काही नेत्यांची नावे
पत्राच्या मधोमध दडलेल्या एका महत्त्वपूर्ण परिच्छेदात, मोकीम यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वासाठी काही नावांचा उल्लेख केला आहे. या नावांमध्ये शशी थरूर यांचा समावेश आहे, ज्यांनी 2020 मध्ये 'G-23' गटाचा भाग म्हणून सोनिया गांधी यांना असेच एक पत्र लिहिले होते.
त्यांनी उल्लेख केलेल्या इतर नावांपैकी, कर्नाटकमधील डीके शिवकुमार आणि राजस्थानमधील सचिन पायलट यांनी त्यांच्या राज्यांमध्ये प्रस्थापित काँग्रेस नेत्यांना आव्हान दिल्यानंतर ते चर्चेत आले होते. हे दोन्ही नेते सिद्धरामय्या आणि अशोक गेहलोत गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जातात.
याव्यतिरिक्त, मोकीम यांनी राहुल गांधी यांची बहीण आणि सध्या वायनाडच्या लोकसभा खासदार असलेल्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे नावही घेतले आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना राष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्वाची भूमिका घेण्याची वारंवार मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Rahul Gandhi : चुकीला माफी नाही! काँग्रेसच्या बैठकीत चक्क राहुल गांधींना मिळाली शिक्षा, काय आहे कारण? )
'चुकीच्या निर्णयांचा' पक्षाला फटका
पत्राच्या सुरुवातीलाच मोकीम यांनी लिहिले आहे, "मॅडम, मी आज आपल्याला अत्यंत वेदनेच्या भावनेने लिहित आहे... बिहार, दिल्ली, हरियाणा (या तिन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला) मधील अलीकडील निकाल हे केवळ निवडणुकीतील अपयश नाहीत; ते सखोल संघटनात्मक तुटलेपणा दर्शवतात. चुकीच्या निर्णयांची मालिका, दिशाहीन नेतृत्वाच्या निवडी आणि चुकीच्या हातात जबाबदारीचे केंद्रीकरण यामुळे पक्षाला आतून कमकुवत केले आहे. आता जागे झालो नाही, तर आपल्याला वारसा मिळालेली काँग्रेस आपण गमावून बसू."
खर्गे यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह
मोकीम यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.त्यांनी तक्रार केली की, 83 वर्षीय अनुभवी खर्गे 'भारताच्या तरुणांशी (म्हणजेच त्यांच्या वर्गीकरणानुसार 35 वर्षांखालील लोक)' जोडले जाण्यास असमर्थ आहेत आणि त्यांच्या मते, हे तरुण लोक एकूण लोकसंख्येच्या जवळपास 65 टक्क्यांहून अधिक आहेत.
पक्ष नेतृत्वामध्ये आणि भारतीय युवकांमध्ये वाढत असलेल्या या 'सखोल तुटलेपणा'मुळेच 'ज्योतीरादित्य शिंदे आणि हेमंत बिस्वा सरमा' यांसारख्या धडाडीच्या तरु नेत्यांनी पक्षा सोडचिठ्ठी दिली.शिंदे यांनी 2020 मध्ये तर सरमा यांनी 2014 मध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाल्याने काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे यांच्या पक्ष बदलण्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पडले, तर सरमा यांच्या जाण्यामुळे संपूर्ण ईशान्य भारतात काँग्रेस जवळपास संपली आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीतील मोठा पराभव
फेब्रुवारीमध्ये काँग्रेसच्या राज्य युनिट प्रमुख पदाच्या शर्यतीत असलेले मोकीम यांनी गेल्या महिन्यात झालेल्या नुवापाडा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील मोठ्या पराभवाचा उल्लेख केला.या ठिकाणी भाजपाचे जय धोलाकिया 80,000 हून अधिक मतांनी विजयी केले. ही घटना म्हणजे लोकांचा विश्वास कमी झाल्याचा आणखी एक पुरावा असल्याचे मोकीम यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world