मराठवाड्यातील जवळपास 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या पेक्षा धक्कादायक म्हणजे माजी शिक्षण मंत्र्यांना याचा दोष थेट शिक्षकांना दिला आहे. या स्थितीला शिक्षकच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हणलं आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे. जर विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसेल तर त्याला शिक्षक जबाबदार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. शिर्डी इथं आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शाळेत मुलांना मराठी शिकवण ही शिक्षकांची जबाबदारी आहे. त्यांना अर्ध्या पगारावर प्रशिक्षणाला पाठवून त्यांच्यात सुधारणा करावी असा आद्यादेश काढण्यात आला होता. राज्यातील एकूण पगार 1 लाख 42 हजार कोटी आहे. त्यातील निम्मा पगार 70 हजार कोटी हा शिक्षकांवर खर्च केला जातो. त्यामुळे शिक्षकांनी मुलांवर लक्ष दिलं पाहीजे असं केसरकर यांनी स्पष्ट केलय. माजी शिक्षण मंत्र्यांनेत शिक्षकांवर खापर फोडण्याने हा विषय पेटण्याची दाट शक्यता आहे.
दिपक केसरकर हे नियमित शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यानंतर ते माध्यमां बरोबर बोलत होते. कोकणातील माणसं काही मागत नाही. म्हणजे त्यांना काही द्यायचचं नाही असं नाही. मी फक्त कोकणाकडे लक्ष ठेवा ऐवढचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. असं केसरकर यांनी आवर्जून म्हणाले. केसरकरांना महायुती सरकारमध्ये वगळण्यात आलं होतं. ते मागिल सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. यावेळी मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही.
यावर ही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नाराज नाही. हे पहिल्या दिवसापासून सांगत आहे. केसरकर हे मंत्री असताना ते रामटेक बंगल्यात राहत होते. त्या बंगल्यात शरद पवार, विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे यांच्या सारखे नेते राहून गेले आहेत. मी देखिल रामटेक बंगल्यात राहीलोय. तेव्हा चांगल्या वास्तूची पुजा करायची असते. शेवटी बंगल्यात राहतो की प्लॅट मध्ये यावरुन मंत्र्यांचे अधिकार ठरत नसतात असं देखिल केसरकर यांनी स्पष्ट केलय. मात्र रामटेकमध्ये कोण कोण राहीले याचं उदाहरण केसरकरांनी का दिले याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.