नाशिकमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच, जागा वाटपावरून बिघाडी होणार?

नाशिक शहरात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. यातील दोन मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

नाशिक लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनिती शिवसेना ठाकरे गटाने आखली आहे. नाशिक शहरात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. यातील दोन मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.यामुळे आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनीही आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आघाडीत बिघाडी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिक शहरांमध्ये विधानसभेच्या 3 जागा आहे. यातील नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या दोन विधानसभा मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. केवळ दावा केला नसून  एकमताने ठराव  करण्यात आला आहे.  मध्य आणि पश्चिमच्या जागेवर उमेदवार कोण असतील याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर तर नाशिक मध्य मधून माजी आमदार वसंत गीते हे निवडणूक लढतील असे शिवसेना ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

एकीकडे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असताना दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातही याच्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून नितीन भोसले हे इच्छुक आहेत. ते सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. मागिल वेळी त्यांनी याच मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेच्या परस्पर निर्णयाला विरोध केला आहे. तर याच जागेवर काँग्रेसचाही दावा आहे. हेमलता पाटील यांनी आपण या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तर पश्चिम मधून शरद पवार गटाचे नाना महाले यांनी ही आपला दावा ठोकला आहे. 

( नक्की वाचा : सलमान खानच्या घरावर गोळी चालवणारा 'मामा' कोण? मुंबई पोलिसांसमोर नवी डोकेदुखी )

महाविकास आघाडीकडे इच्छुकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. एकाच मतदार संघात तीन तीन इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. शिवाय सर्व इच्छुक हे ताकदीचे उमेदवार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवाय मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरही रस्सीखेच असणार आहे. अशा वेळी बंडखोरी रोखण्याचे आव्हानही महाविकास आघाडी समोर असेल. 

Advertisement
Topics mentioned in this article