
Mahua Moitra News: तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी दुसरं लग्न केलं आहे. त्यांनी बीजू जनता दलाचे (BJD) माजी खासदार आणि वकील पिनाकी मिश्रा (Pinaki Misra ) यांच्याशी या आठवड्यात जर्मनीमध्ये विवाह केला, असं वृत्त अनेक मीडिया पोर्टलनं दिलं आहे. याबाबतच्या वृत्तानुसार 50 वर्षांच्या मोईत्रा यांनी 65 वर्षांच्या मिश्रा यांच्याशी 3 जून रोजी लग्न केले. मात्र याबाबत मोईत्रा किंवा मिश्रा या दोघांपैकी कोणीही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. त्यांचा लग्नानंतरचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हाय.रल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांना याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
मोईत्रा यांचा राजकीय प्रवास
गुंतवणूक बँकर म्हणून व्यवसाय करणाऱ्या मोईत्रा पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथून लोकसभेच्या सदस्य आहेत. त्या दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी त्या एकदा राज्य विधानसभेच्या सदस्य होत्या.

मोईत्रा यांचे यापूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी लग्न झाले होते. परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.
( नक्की वाचा : Virtual बकरी ईद साजरी करा, नितेश राणेंचा सल्ला, भाजपाच्या नेत्यावरही बरसले )
कोण आहेत पिनाकी मिश्रा?
बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते पिनाकी मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील आहेत. ते ओडिशातील पूरीमधून चार वेळा लोकसभेचे खासदार होते. पिनाकी यांचे पहिले लग्न संगीता मिश्रा यांच्याशी झाले होते. पिनाकी आणि संगीता 16 जानेवारी 1984 रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले देखील आहेत. आता पिनाकी महुआ मोईत्रा यांच्यासोबत नातेसंबंधात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world