महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असताना मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे हे अजूनही नाराज असल्याचं बोललं जात आहे. ते मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याबाबत बुधवारी संध्याकाळी निर्णय सांगणार होते. पण अजूनही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसतील तर आमच्या पैकी कोणीही मंत्रिपद स्विकारणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शपथविधीच्या काही तास आधी मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उदय सामंत यांनी शपथविधी आधी पत्रकार परिषद घेत महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. शिवसेनेतील एकाही आमदाराला आपण उपमुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही. किंवा कोणी त्या पदासाठी इच्छुकही नाही. एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री व्हावं अशी सर्व आमदारांची इच्छा आहे. आम्ही तशी त्यांना गळही घातली आहे असे सामंत म्हणाले. जर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारली नाही. तर आम्ही ही कोणतीही जबाबदारी स्विकारणार नाही. ही भूमीका आम्ही सर्वांनी शिंदे यांना सांगितली आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की शिंदे हे पद स्विकारतील. जनतेसाठी आणलेल्या योजना अंमलबजावणी करण्यासाठी ते मंत्रिमंडळात राहून सहकार्य करतील असंही ते यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं नाही तर आमच्या पैकी एकही जण कोणतंही मंत्रिपद स्विकारणार नाही. आम्हाला पूर्ण खात्री आहे. ते पद स्विकारतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा निर्णय एका तासात शिंदे घेतील. तो निर्णय सर्वांना कळवला जाईल असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. शिंदेंच्या हातात आमचे राजकीय करिअर. त्यांना डावलून काही होणार नाही. त्यामुळे पक्षातील दुसरा कोणी व्यक्ती उपमुख्यमंत्री व्हावा अशी कोणाचीही भावना नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - शपथविधी सोहळ्यापूर्वी मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन
एकनाथ शिंदेंना निर्णय घ्यायला ऐवढा वेळ का लागत आहे याबाबतही सामंत यांनी स्पष्टी करण दिलं आहे. सर्व निर्णय शिंदे हे विचार करून घेत आहेत. आम्ही सर्वांनीही शिंदेंची भेट घेतली. शिवाय त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा आग्रही केला आहे. त्यामुळे ते त्याचा सकारात्मक विचार करतील असंही ते म्हणाले. हे कोणतेही दबाव तंत्र नाही असंही त्यांनी सांगितलं. ते जरूर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असंही ते म्हणाले. आम्हाला आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे ह सरकारमध्ये असणे गरजेचे असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - भाजपची यशस्वी मध्यस्थी! आज एकनाथ शिंदेंचाही शपथविधी; 'ही' महत्वाची खाती मिळणार?
आमच्या पैकी कोणाची ही उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. आमची भूमीका स्पष्ट आहे. जाहीर पणे सांगतो. ज्या सिस्टममध्ये शिंदे राहाणार नसतील. तर आम्ही ही त्या सिस्टीममध्ये राहून उपयोग काय असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला आहे. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे यांनी निर्णय न घेतल्यामुळे महायुतीचे टेन्शन मात्र वाढले आहे. शिंदे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आग्रही आहेत याची चर्चा आता सुरू झाली. त्यामुळे शिंदेंचा आग्रह भाजप मान्य करणार की शिंदें शिवाय पुढे जाणार हे पहावं लागणार आहे.