- शिवसेनेतील फूटानंतर अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले असून गळती अजूनही सुरू आहे
- प्रहार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे
- उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आहेत. ही गळती अजून ही सुरूच आहे. एक-एक नेते सोडून जात असले तरी उद्धव ठाकरे हे आपण ठाम पणे लढणार असल्याचं सांगत आहेत. आज मातोश्रीवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतल्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला. त्यावेळी उद्धव यांनी बच्चू कडू यांच्यावर प्रहार करण्याची संधी सोडली नाही. घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली अशा शब्दात उद्धव यांनी आपली भावना व्यक्त केली.
बच्चू कडू हे एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी ही नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. त्याला निमित्त ठरलं ते मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटातील प्रवेश. या पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना ठाकरे म्हणाले की आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. मी घरी बोलवून त्याला मंत्री केला, ही माझी चूक झाली असं ते यावेळी म्हणाले. ज्यावेळी अनेक जण मंत्रीपदाच्या शर्यतीत होते त्यावेळी कडू यांना संधी दिल्याचे ते म्हणाले.
नक्की वाचा - Akola News: '500 रुपयांसाठी 18 एकर शेती पेटवली' प्रकरण ऐकून अंगावर काटा येईल
जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत. याचा मला आनंद आहे असं ही ते यावेळी म्हणाले. जे लोभापाई गेले ते जाऊ द्या, लढणारे आहेत ते माझ्या सोबत आहेत. त्यामुळे आपल्याला वेगळी शक्ती मिळते असं ही त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यावेळी ते बोलत होते. बच्चू कडू यांनी शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नाराज प्रहार संघटनेच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला. यावेळी अंबादास दानवे, राहुल पाटील, खासदार नागेश अष्टीकर उपस्थित होते. कडू यांच्या संघटनेचे अनेक लोक त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जोडले गेले आहेत. बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषद देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू हे प्रहार संघटनेकडून निवडणूक रिंगणात होते. पण त्यांचा पराभव झाला. ऐवढेच नाही तर ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र आता त्यांचे पुनर्वसन झाले आहे.