
एकनाथ शिंदे पुण्यातील कार्यक्रमात जय गुजरात बोलल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. विरोधक शिंदेंवर तुटून पडले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे गुजरात कनेक्शन काय अशी टीका ही झाली. त्यांच्या पक्षाची स्थापनाच गुजरातमध्ये झाली होती. अमित शाह हेच त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.शिवसेना ठाकरे गटाने एकामागून एक असे प्रहार एकनाथ शिंदे यांच्यावर केले. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाने ही ठाकरे गटाला जशाच तसे उत्तर दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रसोबत जय गुजरात म्हटल्यानंतर ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. आता त्यात शिवसेना शिंदे गटाने आपल्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावर उद्धव ठाकरेंचा एका जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात उद्धव ठाकरे हे 'जय गुजरात' म्हणत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओ खाली ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू' अशीही टीका करण्यात आली आहे. त्यामुळे याआधी उद्धव ठाकरे यांनी ही जय गुजरातचा नारा दिला होता हे शिंदे गटाने दाखवून दिले आहे.
एक तर हे भोंदू आहेत, नाही तर संधीसाधू! pic.twitter.com/mXEtLx25xK
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) July 4, 2025
मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता असा दावा शिंदे गटाचा आहे. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा', अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी' अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू'. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.
तर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. गुजराती मतांसाठई उद्धव ठाकरे यांनी गुजरातींना जवळ केले होते. मराठी आणि गुजराती भाषा दुधात साखरे प्रमाणे मिसळल्या आहेत असं म्हटलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली आहे. मराठीचा ठाकरेंना ऐवढाच पुळका आहे तर राजकुमार धुत, प्रियंका चतुर्वेदी, प्रितिश नंदी यांना राज्यसभेवर पाठवले. हे सर्व मराठी होते का? त्यावेळी त्यांना मराठी माणसाची आठवण का झाली नाही असा प्रश्न करत ठाकरेंवर पलटवार केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world