जाहिरात

पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Prakash Ambedkar-Pankaja Munde Meet : प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची अचानक भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Prakash Ambedkar-Pankaja Munde
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी 

वंचित बहुजन आघाडीचे  प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची आज (मंगळवार, 30 जुलै) लातूरमध्ये भेट दिली. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राज्यात राजकारणात वातावरण तापलं आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक आहेत.  पंकजा मुंडे या प्रमुख ओबीसी नेत्या आहेत. तर आंबेडकरांनी मराठ्यांना सरसकट आरक्षणाला विरोध केला आहे. आंबेडकर यांनी या 'आरक्षण बचाव' यात्रा सुरु केली आहे. आंबेडकर यांची यात्रा लातूरहून बीड जिल्ह्यात दाखल झाली. त्यापूर्वी आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची अचानक भेट झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी अंबाजोगाईमध्ये पत्रकारांशी बोलताना या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले आंबेडकर?

पंकजा मुंडे यांनी माझी भेट घेतली मी त्यांना भेटलो नाही त्याचा काय हेतू हे त्यांना विचारा, असं आंबेडकर यांनी सांगितलं. 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंडल दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिलं आहे. आता फक्त भेट द्यायची की सहभागी व्हायटं हे त्यांनी ठरवावं. 

विश्वनाथ प्रताप सिंह यांनी 7 ऑगस्ट रोजी मंडल कमिशन लागू करत जीआर काढला होता. ओबीसीच्या आयुष्यातला सामाजिक परिवर्तन करणारा हा दिवस आहे. 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये यात्रेची सांगता मंडल दिवस म्हणून साजरा करणार असल्याचं आंबेडकर यांनी जाहीर केलं. 

राजकीय पक्ष हे एका जातीचे पक्ष आहेत. हा स्टॅम्प मिटला पाहिजे. जरांगे पाटील यांना मराठ्यांचा पाठिंबा तर ओबीसींचा विरोध आहे. प्रत्येक गावात मराठा आणि ओबीसी हे दोन गट तयार झाले आहेत. 

( नक्की वाचा : Exclusive : आता उपोषण नाही इलेक्शन! जरांगे पाटलांचं ठरलं, वाचा संपूर्ण प्लॅन )

मराठा आरक्षण म्हणजे मिळालेलं काढून घेण्याचा मार्ग आहे. ओबीसीचं इतरांना देण्याचं घाट रचण्यात आला आहे. नवीन आरक्षणासाठी नवीन ताट द्या, अशी मागणी आंबेडकरांनी केली. 

55 लाख ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. हे प्रमाणपत्र बोगस असल्याची वंचितची भूमिका आहे. ओबीसींचा राजकीय चेहरा आणखी जन्माला आलेला नाही.जो जन्माला आला आहे तो त्याचा समाजाचा चेहरा आहे. आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसीचा राजकीय चेहरा समोर आला पाहिजे, असं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं. 

फडणवीसांना चॅलेंज

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चॅलेंज दिलं. भाजप धनगर समाजचा एक उमेदवार देऊ शकत नाही ते आरक्षण कसे वाचवणार? मराठा आरक्षणाला समर्थन का विरोध हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असं चॅलेंज त्यांनी यावेळी दिलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com