जाहिरात

Pankaja Munde Helicopter Fault: पंकजा मुंडेंच्या आईने लेकीसाठी देव पाण्यात ठेवले, कारण ऐकून काळजात होईल धस्स

Pankaja Munde Helicopter Technical Fault: मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलीय.

Pankaja Munde Helicopter Fault: पंकजा मुंडेंच्या आईने लेकीसाठी देव पाण्यात ठेवले, कारण ऐकून काळजात होईल धस्स
"Pankaja Munde Helicopter Technical Fault: पंकजा मुंडेच्या आईंनी देव पाण्यात ठेवले, कारण..."
Pankaja Munde X

- लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Pankaja Munde Helicopter Technical Fault: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलीय. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरच्या दिशेने प्रवास करताना ही घटना घडली. यामुळे त्यांचा लातूर दौरा रद्द करण्यात आलाय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा 2 फेब्रुवारीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सभेला संबोधित करत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की,"मी आज प्रवास केला, तर माझी आई सकाळपासून देव पाण्यात ठेवून बसलीय. का तर पंकजा विमानाने गेलीय, तिने सुखरूप पोहोचावे. तिच्या जिवाला काळजी वाटत होती."

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

लातूर दौऱ्यासाठी मंगळवारी (3 फेब्रुवारी) सकाळी निघालेल्या असताना पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ऐनवेळेस तांत्रिक बिघाड झाला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तातडीने आवश्यक ती पावले उचलण्यात आली. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी विमानतळावर जाण्याऐवजी हॉटेलमध्येच थांबणं पसंत केलं. तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत उड्डाण रद्द करण्यात आले. थोड्या वेळाने पक्षाकडून त्यांच्यासाठी दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली.    

(नक्की वाचा: Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड! लातूर दौरा रखडला)

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना संबोधित करण्यासाठी पंकजा मुंडे लातूरकडे रवाना होत होत्या. किनगाव गणातील उमेदवारांच्या प्रचारासाठी किनगाव येथे मंगळवारी (3 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता पंकजा मुंडे यांची प्रचार सभा होणार होती. पण हेलिकॉप्टर बिघाडामुळे दौरा रद्द करण्यात आला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com