Chhagan Bhujbal : भुजबळांवर अन्याय झालाय, मुख्यमंत्री त्याबाबत... राम शिंदे यांचं मोठं वक्तव्य

Ram Shinde on Chhagan Bhujbal : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांन छगन भुजबळांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

Ram Shinde on Chhagan Bhujbal : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कोल्हापूरमधील श्री आंबाबाईचं दर्शन घेतलं. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवशेनामध्ये शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर शिंदे यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल बोलून दाखवली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील अन्यायाची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर होईपर्यंत मुख्यमंत्री शांत बसणार नाहत, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नुरा कुस्तीचा बळी

विधानसभेला निवडून आल्यानंतर दर्शन घ्यायचं ठरवलं होतं मात्र आता सभापती झाल्यानंतर दर्शन घेतलं. विधानसभेत पराभव झाल्यानंतर देखील माझी वरिष्ठ पदावर निवड झाली. निवडून आलो असतो तरी पद मिळाला असतं आणि निवडून आलो नाही तरी पद मिळालं, असं शिंदे यांनी सांगितलं. 

विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी चांगलं वातावरण होतं. निवडणूक येण्याची शक्यता देखील होती. मात्र आपल्या सहकाऱ्यांनी दगाफटका केला. सहकाऱ्यांनी नुरा कुस्ती आयोजित केली होती. त्याचा मी बळी ठरलो. आता पराभव झाला आहे, मात्र भविष्यात या पराभवाची मी गांभीर्यपूर्वक दखल घेईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. 

( नक्की वाचा : छगन भुजबळ CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय? )

महायुतीला राज्यात चांगले यश मिळाले आहे. विरोधी पक्षनेतेसाठी होण्यासाठी दहा टक्के आमदार निवडून येणे नियम आहे.विरोधी पक्षाने विरोधी पक्षनेते पदासाठी मागणी केली आहे मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. लोकसभेमध्ये देखील दहा वर्ष विरोधी पक्ष नेता नव्हता अशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, असं शिंदे म्हणाले.  

Advertisement

भुजबळांबाबत गांभीर्यपूर्वक विचार

भुजबळ हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांच्या बाबतीत जे काही झालं, त्या संदर्भात गांभीर्यपूर्वक विचार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीय. त्यांचावरील अन्याय दूर झाल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : State Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदेचं वजन कायम, 2 महत्त्वाची खाती खेचण्यात यश )

बीड जिल्ह्यात एका संरपंचाचा मृत्यू होणे ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणात पोलीस अधिक्षकांची  बदली करण्यात  आली आहे. काही आरोपींना अटक केली आहे उर्वरित देखील लवकर अटक होईल, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावरही त्यांनी टीका केलीय. 

Advertisement

माझी सभापतीपदी निवड झाली आहे यामुळे मला आणि धनगर समाजाला आनंद झाला आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आरक्षण आणि इतर प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी वरिष्ठ पदावर असल्याने चांगला उपयोग होईल, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. 
 

Topics mentioned in this article