राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आठवडाभरापासून नाराज आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने छगन भुजबळ यांना आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळायंना देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मात्र अजित पवारांपासून दूर जाणारे भुजबळ फडणवीसांच्या भेटीला गेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस-भुजबळ यांच्या भेटीचा अर्थ नेमका काय हे समजून घेऊया.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकीय पुनवर्सन
छगन भुजबळ यांचा गेल्या काही दिवसातील नाराजीचा रोख अजित पवारांकडेच आहे. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते असले तरी राष्ट्रवादीमध्ये त्यांना तसं स्थान दिलं जात नसल्याने भुजबळ नाराज आहे. भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहायचं नसेल तर त्यांचं राजकीय पूनर्वसन करण्याची भूमिका भाजप घेईल का? तसं करायचं झाल्यास काय? याबाबत या बैठकीत चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे.
(नक्की वाचा- Chhagan Bhujbal: CM फडणवीसांनी शब्द दिला.. मुख्यमंत्र्यांसोबत काय झाली चर्चा? छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं)
राग शांत करण्यासाठी मध्यस्थी
छगन भुजबळांचा राग शांत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी कामी येऊ शकते. त्याच दृष्टीकोनातून ही बैठक असावी, अशी शक्यता आहे. काही दिवसांना राज्यसभेच्या काही रिक्त होणार आहेत. त्यावेळी छगन भुजबळा यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याच शक्यता आहे.
राज्यसभेवर पाठवण्याची तयारी
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक जागा भाजपच्या कोट्यातून शिल्लक आहे . ही जागा छगन भुजबळ यांना दिली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ओबीसी नेत्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने काही घडतंय का? अशीही शक्यता आहे.
(नक्की वाचा- Mahayuti Government : महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच; नव्या फॉर्म्युल्याने काढणार तोडगा?)
महायुतीपासून दूर जाऊ नयेत यासाठी प्रयत्न
छगन भुजबळ महायुतीपासून दूर जाऊ नयेत यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. त्यांना त्या बदल्यात काय द्यावं यावर चर्चा झाली असावी. ओबीसी मतदार दुरावू नये यासाठी प्रयत्न आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world