बेलापूर मतदार संघात भाजपची उमेदवारी कोणाला? नाईक विरूद्ध म्हात्रे सामना रंगणार?

बेलापूर मतदार संघात मंदा म्हात्रे या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. तर इथून संदीप नाईक हे गणेश नाईक यांचे पुत्र या मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

सीबीडी बेलापूर विधानसभा मतदार संघात यावेळी भाजप समोर भाजपचेच आव्हान असेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे. या मतदार संघात मंदा म्हात्रे या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. तर इथून संदीप नाईक हे गणेश नाईक यांचे पुत्र या मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र उमेदवारी नाही मिळाली तरी अन्य पक्षातून निवडणूक लढण्याची मानसिकता संदीप नाईक यांनी केली आहे. त्यामुळे कदाचीत ते ऐन वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचा आसरा घेतली अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे मनसेही उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाचे माजी सनदी अधिकारी विजय नहाटा यांचाही या मतदार संघावर डोळा आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बेलापूर हा मतदार संघ तसा गणेश नाईक यांचा. या मतदार संघातून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होती. मात्र भाजपे त्यांच्या ऐवजी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. गणेश नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी मिळाली. त्यावेळी संदीप नाईक यांना जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून गणेश नाईक यांना संधी देण्यात आली. 2009 आणि 2014 अशा दोन निवडणुका संदीप नाईक यांनी ऐरोली विधानसभा मतदार संघातून जिंकल्या आहेत. यावेळी ते बेलापूर मतदार संघातून निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. मात्र या ठिकाणी मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार आहेत. शिवाय त्या देवेंद्र फडणवीसंच्या जवळच्या समजल्या जातात. जर गणेश नाईक यांनी भाजप उमेदवारी देणार असेल तर एकाच घरात दोन तिकीट देण्यावर भाजपमध्ये विचार होवू शकतो. त्यामुळे संदीप नाईक यांनी तयारी जरी केली असेल तरी त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळेल का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसे न झाल्यास महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढण्याची तयारी संदीप नाईक यांनी केली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?

मंदा म्हात्रे या भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी बेलापूर विधानसभेतून गणेश नाईक यांचा पराभव केला होता. सलग दोन वेळा त्या विधानसभेवर याच मतदार संघातून निवडून गेल्या आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांचा या मतदार संघावर दावा आहे. शिवाय त्यांना हॅटट्रीक करण्याची संधी ही आहे.  2019 च्या निवडणुकीत बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना 87 हजार 858 मते मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशोक गावडे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत अशोक गावडे यांना 44 हजार 261 मते मिळाली होती. तर मनसेच्या गजनन काळे यांना 27 हजार 000 मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहीले होते. मंदा म्हात्रे यांचा मतदार संघात चांगला जनसंपर्क आहे. म्हात्रे विरूद्ध नाईक असाच संघर्ष या मतदार संघात राहीला आहे. मात्र हे दोघेही सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे या दोघां पैकी एकाला या मतदार संघातून उमेदवारी मिळेल. तसे न झाल्यास बंडखोरी अटळ आहे अशी चर्चा आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?

एकीकडे भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच असताना शिवसेना शिंदे गटानेही या मतदार संघावर दावा केला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी आयएएस अधिकारी  विजय नाहाटा हे या मतदार संघात मोर्चे बांधणी करत आहेत. हल्लीच त्यांनी नेरुळ येथे जनसंपर्क कार्यालय देखील स्थापन केले आहे. विजय नाहाटा हे गणेश नाईक यांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात. 2014 साली विजय नाहाटा यांच्या उमेदवारीमुळेच गणेश नाईक यांचा अगदी अल्पशा मतांनी पराभव झाला होता. बेलापूरची जागा भाजपकडे आहे. त्यामुळे ते कदाचीत अपक्ष ही लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाहाटा हे शिवसेना शिंदे गटाचे महत्वाचे नेते आहेत. तसेच ते एकनाथ शिंदे यांचे फार जवळचे मानले जातात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?

महायुतीत उमेदवारीसाठी या मतदार संघात रस्सीखेच असली तरी महाविकास आघाडीकडून लढण्याची इच्छा असणारेही बरेच नेते आहेत. त्यात नामदेव भगत, डॉ. राजेश पाटील, चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. तर मनसेकडून गजानन काळे पुन्हा रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. मनसेला या मतदार संघात चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे बहुरंगी लढत या मतदार संघात होईल अशी चर्चा आहे. या मतदारसंघाचा 85% भाग शहरी आहे. तर 15% भाग हा मूळ आगरी कोळी गावठाणांनी आणि काहीसा झोपड्पट्टीने व्यापलेला आहे. मतदारसंघात मराठी आणि आगरी कोळी समाजाची संख्या पाहता मतदानातील अंदाजे 65% हिस्सा या समाजाचा आहे. उरलेला 35% वर्गात गुजराती, राजस्थानी, दक्षिण व उत्तर भारतीय व काही अंशी शीख समाज आहे. म्हणूनच या मतदारसंघात मराठी आणि आगरी कोळी मतदारांची निर्णायक भूमिका राहील.