भाजपमध्ये योगी आदित्यनाथ हटाओ मोहीम?

उत्तर प्रदेशातील 10 विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर राज्यात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

उत्तर प्रदेशातील 10 विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर राज्यात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मंत्रिमंडळात बदल केले जाण्याचीही शक्यता आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची योगी यांच्या बद्दल नाराजी असल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी केशव मौर्य यांनी सरकारपेक्षा संघटना मोठी असल्याचं वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य आदित्यनाथ योगी यांच्याविरोधात असल्याचं म्हटलं जात होतं.    

त्याचबरोबर उत्तर प्रदेशात भाजप प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र चौधरी यांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वातील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे भाजपमध्ये योगी आदित्यनाथ हटाओ मोहिमेला सुरूवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून काढलं तर त्यांना भाजप राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आणि अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी देखील नोकर भरतीत एसटी एससीच्या जागा भरताना या जागेचा उमेदवार नाही, म्हणून इतर उमेदवार भरले जात असल्यासंदर्भात योगींवर निशाणा साधला होता. त्यात उत्तर प्रदेशात भाजप कार्यसमितीची बैठक नुकतीच पार पडली, त्या बैठकीतील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. 

नक्की वाचा - कर्नाटकातील 100 टक्के आरक्षण विधेयक काय आहे? कोणते बदल होणार?

महत्त्वाचे मुद्देः

  • उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणूकीच्या पराभवानंतर उत्तर प्रदेश कार्यसमितीची बैठक झाली. 
  • बैठकीत केशव प्रसाद मौर्य यांनी मोठं वक्तव्य केलं. सरकारपेक्षा संघटना मोठे असल्याचं वक्तव्य मौर्य यांनी केलंय. 
  • ज्या कार्यकर्त्यांच्या वेदना त्याच माझ्या वेदना असल्याचंही केशव प्रसाद मौर्य म्हणाले.
  • तर अतिआत्मविश्वासामुळे नुकसान झाल्याचं मत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलंय
  • पराभवावर चिंतन करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं.