जाहिरात

दात पडले तरी काम करतात, तरुणांच्या संधी हिरावतात! मंत्र्याची रजनीकांत यांच्यावर जहरी टीका

Rajinikanth News: 'जुने विरुद्ध नवे' असा राजकारणातील संघर्ष रजनीकांत यांनी मार्मिक शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला होता

दात पडले तरी काम करतात, तरुणांच्या संधी हिरावतात! मंत्र्याची रजनीकांत यांच्यावर जहरी टीका
माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे दिवंगत नेते करुणानिधी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात रजनीकांत यांनी स्टॅलिन यांचे कौतुक केले
चेन्नई:

Rajinikanth News: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्यावर तमिळनाडूच्या एका मंत्र्याने जहरी टीका केली आहे.  'जुने विरुद्ध नवे' असा राजकारणातील संघर्ष रजनीकांत यांनी मार्मिक शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यामुळे तमिळनाडूतील मंत्री दुराई मुरुगन हे संतापले असून त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली आहे. 'दात पडले तरी काही लोक काम करत राहतात' असे विधान मुरुगन यांनी केले आहे. अशा म्हाताऱ्या कलाकारांमुळे तरुणांच्या संधी हिरावल्या जात असल्याचे मुरुगन यांनी म्हटले आहे.

अभिनेते रजनीकांत यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे कौतुक केले होते. स्टॅलिन यांनी जुन्या लोकांना ज्या पद्धतीने हाताळले आहे, त्याला तोड नाही अशा शब्दात रजनीकांत यांनी कौतुक केले होते. माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे दिवंगत नेते करुणानिधी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात रजनीकांत यांनी स्टॅलिन यांचे कौतुक केले होते. हा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता.

चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य

(नक्की वाचा: चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य)

रजनीकांत यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, "शाळेतल्या नव्या विद्यार्थ्यांना हातळणं ही काही कठीण गोष्ट नाहीये. मात्र जुन्या विद्यार्थ्यांना (वरिष्ठ नेते) ही कठीण गोष्ट असते. डीएमके पक्षात असे बरेच जुने नेते आहेत. ते काही साधेसुधे विद्यार्थी नाहीयेत. सगळे अव्वल दर्जाचे विद्यार्थी आहेत. हे सर्व उत्तम गुण मिळवणारे विद्यार्थी असून ते वर्ग सोडायला अजिबात तयार नसतात. खासकरून दुराई मुरुगन. त्यामुळे स्टॅलिन यांच्याबाबत बोलावे तेवढे कमी आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना हाताळलं आहे, त्याबद्दल त्यांना सॅल्युट करावासा वाटतो. "

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवर 'माफिया'चं राज्य, अभिनेत्री लैंगिक शोषणाच्या शिकार! सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा

(नक्की वाचा: मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवर 'माफिया'चं राज्य, अभिनेत्री लैंगिक शोषणाच्या शिकार! सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा) 

रजनीकांत यांच्या या विधानामुळे स्टॅलिन जरी खूश झाले असले तरी डीएमकेचे नेते आणि खासकरून दुराई मुरुगन जाम संतापलेत.  रजनीकांत यांनी आपला एकप्रकारे अपमान केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.  यामुळे त्यांनीही रजनीकांत यांच्यावर टीका केली आहे.  त्यांनी म्हटले आहे की, "रजनीकांत यांनी म्हटले त्याचप्रमाणे म्हाताऱ्या कलाकारांमुळे तरुण कलाकारांच्या संधी हिरावल्या जात आहेत. दाढ्या वाढल्यानंतर, दात पडल्यानंतरही हे अभिनेते काम करत राहतात. "तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा आणि तिथले क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना म्हटले की तरुणांना राजकारणात यायचे आहे. आपल्याला त्यांना जागा करून देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. रजनीकांत यांचे भाषण लोकांना जबरदस्त आवडले आहे. तुम्ही ते भाषण ऐकायला हवे."

'मी जिवंत आहे, प्लीज हे थांबवा...' मृत्यूच्या अफवांमुळे श्रेयस तळपदेचा संताप अनावर

(नक्की वाचा: 'मी जिवंत आहे, प्लीज हे थांबवा...' मृत्यूच्या अफवांमुळे श्रेयस तळपदेचा संताप अनावर)

जन्माष्टमीनिमीत्त मथुरा नगरी सजली, सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com