जाहिरात

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवर 'माफिया'चं राज्य, अभिनेत्री लैंगिक शोषणाच्या शिकार! सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा

Malayalam Film Industry : महिलांच्या सुरक्षेबाबत देशभरातून आक्रोश केला जात असतानाच फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींच्या सुरक्षेबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवर 'माफिया'चं राज्य, अभिनेत्री लैंगिक शोषणाच्या शिकार! सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा
Justice K Hema Committee च्या सदस्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना अहवाल सादर केला. (फोटो सौजन्य -kerala_cmo)
मुंबई:

महिलांच्या सुरक्षेबाबत देशभरातून आक्रोश केला जात असतानाच फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींच्या सुरक्षेबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे. केरळ सरकारनं स्थापन केलेल्या न्या. हेमा समितीच्या रिपोर्टमधून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीची काळी बाजू समोर आलीय. 295 पानांच्या या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. चित्रपटांची कथा आणि सादरीकणाच्या जोरावर जग गाजवणाऱ्या दक्षिण भारतामधील या प्रमुख इंडस्ट्रीनं चित्रपट विश्वाला मान खाली घालावी लागली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इंडस्ट्रीवर 'माफियांचं नियंत्रण

या रिपोर्टनुसार मल्याळम इंडस्ट्री ही 'माफिया'कडून नियंत्रित केली जाते. त्यामध्ये आघाडीचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश आहे. एखाद्या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीला घ्यायचं किंवा कुणाला घ्यायचं नाही हे ही लोकं ठरवतात. इतकंच नाही तर अभिनित्रींसोबत गैरवर्तन करण्यातही ही मंडळी आघाडीवर आहेत. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील महिलांच्या आव्हानांचा शोध घेण्यासाठी 2017 साली केरळ सरकारनं या समितीची स्थापना केली होती. 

मल्याळम इंडस्ट्रीमधील महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं इंडस्ट्रीमध्ये शोषण अगदी सुरुवातीपासून केलं जातं. केवळ अभिनेत्री नाही तर कोणत्याही भूमिका करण्यासाठी त्यांच्याकडं 'तडजोड' करण्याची तसंच शरीरसुखाची मागणी केली जाते. Compromise आणि adjustment हे दोन शब्द इंडस्ट्रीमधील महिलांन नेहमी ऐकवले जातात. त्यांनी मागणीनुसार शरीरसुखाला तयार राहावं असे त्यांना सांगितलं जातं. 

( नक्की वाचा : ती 42 वर्ष जिवंत प्रेत म्हणून जगत होती....अरुणा शानबाग केस काय आहे? सध्या का होतीय चर्चा? )
 

शोषणाचे भयंकर अनुभव

या रिपोर्टमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांचे भयंकर अनुभव सांगितले आहेत. एका अभिनेत्रीला तिला यापूर्वी त्रास दिलेल्या व्यक्तीसोबत तब्बल 17 वेळा एकच प्रसंग चित्रित करण्यास भाग पाडण्यात आले. आणखी एका अभिनेत्रीला चित्रपटातील इंटिमेट प्रसंगांची कल्पना दिग्दर्शकानं आगोदर दिली नव्हती. या अभिनेत्रीनं ते प्रसंग वगळण्याची मागणी केली तर तिला सार्वजनिक पातळीवर बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. 

आऊटडोअर शूटिंगच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. अनेकदा रात्री 'पाहुण्यांकडून' महिलांच्या खोलीचा दरवाजा वाजवला जातो. त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला तर त्यांना धमकावलं जातं. जेवण, शूटींगचं लोकेशन या सारख्या सामान्य गोष्टींमध्येही त्या 'तडजोड' करण्यास तयार होईपर्यंत त्यांची अडवणूक केली जाते, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 

( नक्की वाचा : Kolkata Doctor Murder : 'तुमच्या बॉयफ्रेंडसोबत....', डॉक्टरांच्या आंदोलनावर खासदाराची जीभ घसरली )
 

एखाद्या चित्रपटाचं शूटिंग दुर्गम भागात सुरु असेल तर स्वच्छतागृह तसंच चेंजिंग रुमची कोणतीही सुविधा नसते. महिलांना स्वत:च त्यामधून मार्ग काढावा लागतो, असं या समितीला साक्ष देणाऱ्या जवळपास सर्वांनी सांगितलं आहे. 

केरळमधील विजयन सरकारनं हा रिपोर्ट सार्वजनिक करावा असे आदेश केरळ उच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात दिले होते. या समितीच्या अहवालावर कारवाई करावी यासाठी विजयन सरकारवर दबाव वाढत असतानाच केरळ कलाकारांच्या संघटनेनं यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
प्रियांका चोप्रा-आदिनाथ कोठारेचा नवा सिनेमा, 'पाणी' या दिवशी होणार रिलीज
मल्याळम फिल्म इंडस्ट्रीवर 'माफिया'चं राज्य, अभिनेत्री लैंगिक शोषणाच्या शिकार! सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा
justice-hema-committee-report-on-malayalam-film-industry-black-truth-reveals-female-artist-harassment
Next Article
चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य