Maharashtra ZP Election 2026 Result : राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत भाजपने 225, शिवसेना 162,शिवसेना ठाकरे गट 46,राष्ट्रवादी अजित पवार गट 172, राष्टवादी शरद पवार गट 21,काँग्रेस 55 आणि इतरला 33 जागा मिळाल्या आहेत. राज्यभर राजकीय चर्चा रंगल्या असतानाच काही निकालांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषत: लातूर जिल्हा परिषदेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण या निवडणुकीत दोन जावा एकमेकींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या निवडणुकीत धाकट्या जाऊने थोरल्या जाऊचा फक्त दोन मतांनी पराभव केला. सरिता भिसे यांना 6869 तर आशा भिसे यांना 6871 इतकी मते मिळाली आहेत.
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटात दोन सख्खा जावा एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. काँग्रेसच्या तिकिटावर आशाताई भिसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून सरिता भिसे निवडणुकीला उभ्या होत्या. या दोघींच्या लढतीची लातूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर चर्चा रंगली होती.
नक्की वाचा >> ZP Election 2026: राज्यात भाजपची विजयी हॅट्ट्रिक, 'हे' 2 बडे नेते विजयाचे शिल्पकार अन् सूत्रधार
लातूर जिल्हा परिषद निकाल
- एकूण जागा-59/59
- भाजप-18
- शिवसेना-01
- राष्ट्रवादी-12
- ठाकरे गट-01
- शरद पवार गट -01
- काँग्रेस-23
- मनसे -01
- अपक्ष -02
- एकूण - 59