जाहिरात

Arjun Tendulkar Wedding: शुभमंगल सावधान! सचिन तेंडुलकरचा लाडका लेक अर्जुनचं सानियासोबत या महिन्यात होणार लग्न?

Arjun Tendulkar Wedding Date: सचिन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नाची तारीख समोर आली. या दिवसापासून लग्नसमारंभास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलीय.

Arjun Tendulkar Wedding: शुभमंगल सावधान! सचिन तेंडुलकरचा लाडका लेक अर्जुनचं सानियासोबत या महिन्यात होणार लग्न?
"Arjun Tendulkar Saaniya Chandhok: अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकचे लग्न कधी?"

Arjun Tendulkar Wedding Date: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. सचिन तेंडुलकरचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकरचं या वर्षी लग्न होणार असल्याची माहिती समोर येतेय. ऑगस्ट 2025मध्ये अर्जुन आणि सानिया चंडोकचा साखरपुडा झाला. जवळचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा पार पडला होता. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरनंही त्यांच्या साखरपुड्याच्या वृत्तास दुजोरा दिला होता. सानिया मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे.  

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकचा लग्नसोहळा कधी? 

टाइम्स ऑफ इंडियाने (Bombay Times) दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचं लग्न 5 मार्च 2026 रोजी पार पडणार आहे. लग्नाशी संबंधित अन्य कार्यक्रम 3 मार्चपासून सुरू होतील. सर्व कार्यक्रम कदाचित मुंबईमध्येच पार पडतील. लग्नसोहळ्यामध्ये केवळ खास मित्रपरिवार आणि कुटुंबातील सदस्यच उपस्थित असतील. 

(नक्की वाचा:  Shikhar Dhawan: कोण आहे शिखर धवनची होणारी पत्नी Sophie Shine? कॉर्पोरेट जगात आहे मोठं नाव, वाचा सविस्तर माहिती)

कोण आहे सानिया चंडोक?

सानिया चंडोक (Saaniya Chandhok) ही पेट इंडस्ट्रीमधील एक यशस्वी उद्योजिका आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून तिने बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये पदवी संपादित केलीय. पाळीव प्राण्यांबाबत तिला विशेष आवड आहे आणि हीच आवड तिने व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. Mr. Paws Pet Spa & Store LLP नावाने एक आलिशान पेट स्पा तिने सुरू केलंय. तिच्या या कंपनीची वार्षिक कमाई सुमारे 90 लाख रुपये आहे. 

घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि खाद्य उद्योग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या व्यवसाय इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीशी संबंधित आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com