जाहिरात

Ashes 2025 : रागानं लालबुंद होऊन मॅकग्राने खुर्ची उचलली ! लायनच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर मैदानावर ड्रामा, VIDEO

Nathan Lyon Surpasses Glenn McGrath's 563 Test Wicket : ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडमध्ये ऐकेकाळी ग्राऊंडसमन म्हणून काम करणाऱ्या मुलानं आज त्याच मैदानात इतिहास रचला आहे.

Ashes 2025 : रागानं लालबुंद होऊन मॅकग्राने खुर्ची उचलली ! लायनच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर मैदानावर ड्रामा, VIDEO
Ashes 2025 : ग्लेन मॅकग्राची प्रतिक्रिया तुफान व्हायरल झाली आहे.
मुंबई:

Nathan Lyon Surpasses Glenn McGrath's 563 Test Wicket : ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडमध्ये ऐकेकाळी ग्राऊंडसमन म्हणून काम करणाऱ्या मुलानं आज त्याच मैदानात इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नॅथन लायननं टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत  दिग्गज फास्ट बॉल ग्लेन मॅकग्राला मागं टाकलं आहे. या  ऐतिहासिक क्षणाचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मॅकग्रा चक्क खुर्ची फेकताना दिसत आहे.

मॅकग्रानं खुर्ची का फेकली?

लायननं मॅकग्राचा 563 विकेट्सचा रेकॉर्ड मोडला त्यावेळी मॅकग्रा स्वतः तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होता. स्वतःचा रेकॉर्ड मोडला गेल्याचे पाहून मॅकग्राने गमतीत तिथली खुर्ची उचलली आणि ती रागात फेकत असल्याचं नाटक केलं. 

मॅकग्राने हे सर्व केवळ मजा म्हणून केले असले तरी सोशल मीडियावर फॅन्सना त्याची ही रिअ‍ॅक्शन खूप आवडली आहे. आपलाच रेकॉर्ड मोडणाऱ्या खेळाडूचे अशा अनोख्या पद्धतीने कौतुक करण्याची ही त्याची पद्धत चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.

( नक्की वाचा : Prithvi Shaw :पृथ्वी शॉचं नशीब फक्त 6 मिनिटात बदललं, 'ती' प्रतिक्रिया वाचून फॅन्सही गहिवरले! )
 

ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात यशस्वी बॉलर

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या ॲशेस सीरिजमधील  तिसऱ्या टेस्टमध्ये गुरुवारी लायननं इंग्लंडच्या बेन डकेटला 29 रनवर आऊट केले आणि मॅकग्राला मागे टाकले. त्यानंतर त्याने ओली पोपलाही 3 रनवर आऊट केले.

लायनच्या नावावर आता 141 टेस्ट मॅचमध्ये 564 विकेट्स जमा झाल्या आहेत. या कामगिरीसह तो जगात सर्वात जास्त विकेट्स घेणारा सहावा बॉलर ठरला आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत आता त्याच्या पुढे फक्त दिवंगत शेन वॉर्न आहे, ज्याच्या नावावर 708 विकेट्स आहेत.

( नक्की वाचा : IPL Auction 2026 : वडील खासदार, मुलगा गाजवणार आयपीएलचं मैदान, निवड होताच झाले भावूक ! म्हणाले...)

ग्राउंडसमन ते लेजेंड असा थक्क करणारा प्रवास

नॅथन लायनचा क्रिकेटमधील सर्व प्रवास हा एखाद्या चित्रपटासारखा आहे. ज्या अ‍ॅडलेड ओव्हलवर त्यानं मॅकग्राचा रेकॉर्ड मोडला तिथं तो एकेकाळी ग्राऊंड्समन म्हणून काम करत असे. पिच तयार करणाऱ्या मुलानं  त्याच खेळपट्टीवर जगातील दिग्गज बॅटर्सना नाचवले आहे. लायननं अ‍ॅडलेड ओव्हलवर आत्तापर्यंत 65 विकेट्स घेतल्या असून तो या मैदानावर सर्वात यशस्वी बॉलर ठरला आहे. 

मॅकग्रा आणि लायनच्या आकड्यांची तुलना

ग्लेन मॅकग्राने त्याच्या करिअरमध्ये 124 टेस्टमध्ये 563 विकेट्स घेतल्या होत्या. लायननं आता १४१ टेस्टमध्ये ५६४ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. लायननं मॅकग्रा पेक्षा जास्त मॅचेस खेळल्या असल्या, तरी एक ऑफ स्पिनर म्हणून ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर इतक्या विकेट्स घेणे ही खूप मोठी गोष्ट मानली जात आहे. लायन सध्या ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहता, तो भविष्यात शेन वॉर्नच्या रेकॉर्डच्या किती जवळ पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com