BCCI Announces Rs 131 Crore Prize: टी20 विश्वचषक 2026 मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयने बक्षिसांचा वर्षाव केला आहे. न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियासाठी 131 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हा सर्व पैसा खेळाडूंच्या खिशात जाणार नसून, त्यातील एक मोठा हिस्सा सरकारी तिजोरीत म्हणजेच 'इन्कम टॅक्स'च्या स्वरूपात जमा होणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट अमित कुमार यांच्या विश्लेषणानुसार, खेळाडूंच्या हातात येणारी प्रत्यक्ष रक्कम बरीच कमी असेल.
कराचे नियम काय सांगतात? (Section 115BB)
इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम 115BB नुसार, कोणत्याही बक्षीस किंवा पुरस्काराच्या रक्कमेला 'इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस' मानले जाते. या उत्पन्नावर थेट 30% टॅक्स लागतो. मोठ्या रकमेमुळे यावर 10% ते 37% सरचार्ज आणि 4% आरोग्य व शिक्षण उपकर (Cess) लागतो. क्रिकेटपटूंच्या उच्च उत्पन्नाचा विचार करता, कराचा एकूण दर सुमारे 36% ते 40% च्या दरम्यान असू शकतो.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026 Final: अंतिम सामन्यात धोनी-रोहित उपस्थित, विराट कोहली का दिसला नाही?)
बक्षीस रक्कमेचे अंदाजित गणित
एकूण बक्षिस - 131 कोटी रुपये
टीडीएस (30%) - 39.3 कोटी रुपये
सरचार्ज (अंदाजित 15%) - 5.895 कोटी रुपये
सेस (4%) - 1.83 कोटी रुपये
एकूण टॅक्स कपात- 47 कोटी रुपये
खेळाडूंच्या हाती येणारी रक्कम - अंदाजे 84 कोटी रुपये
Team India
बीसीसीआय टॅक्स कापून देणार
CA अमित कुमार यांच्या मते, ही रक्कम देताना बीसीसीआय 'TDS' (Tax Deduction at Source) कापूनच खेळाडूंना पैसे देईल. खेळाडू त्यांच्या वार्षिक प्राप्तिकर विवरणपत्रात (ITR) काही सवलतींचा दावा करू शकतात, परंतु मोठ्या रकमेवर 30% टॅक्स अनिवार्य आहे.
(नक्की वाचा- Palghar News: पालघर समुद्रकिनारी खळबळ! अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने नागरिकांची पळापळ, चौकशीनंतर सत्य आलं समोर)
भारताचा ऐतिहासिक विक्रम
BCCI सचिव देवजित सैकिया यांनी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, भारतीय संघाने केलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि सिलेक्टर्स यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज आपण हा ऐतिहासिक टप्पा गाठू शकलो आहोत. भविष्यातही टीम इंडिया अशीच चमकदार कामगिरी करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.