BCCI ला 538 कोटींचा दणका ! मुंबई उच्च न्यायालयाने दिला निर्णय, वाचा काय आहे प्रकरण

Massive Blow To BCCI : मुंबई उच्च न्यायालयानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) 538 कोटी देण्याचे आदेश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kochi Tuskers Kerala : एकाच आयपीएल सिझननंतर बीसीसीआयनं 'कोची टस्कर्स' ची मान्यता रद्द केली होती.
मुंबई:

Massive Blow To BCCI : मुंबई उच्च न्यायालयानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मोठा धक्का दिला आहे. उच्च न्यायालयाने बीसीसीआय विरुद्ध कोची टस्कर्स केरळा (Kochi Tuskers Kerala) यांच्यातील वादामध्ये लवादाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यानंतर न्यायालयानं बीसीसीआयला  कोची टस्कर्सला 538 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कोची टस्कर्स केरळा ही फ्रँचायझी 2011 मध्ये फक्त एका आयपीएल सिझननंतर रद्द केली होती. कोची टस्कर्सनं वेळेवर बँक हमी सादर केली नाही. त्यामुळे कराराचा भंग केल्याचा आरोप करत बीसीसीआयनं ही कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकरण लवादाकडे गेलं होतं. 

2015 मध्ये आयपीएल फ्रँचायझी कोची टस्कर्सला 550 कोटी रुपये, केसीपीएलला  (KCP Limited) 384 कोटी रुपये आणि 153 कोटी रुपये रेन्डझव्हस स्पोर्टला (Rendezvous Sports) देण्याचे आदेश दिले होते. बीसीसीआयने लवादाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.

( नक्की वाचा : 'ले ले प्‍लेट, भाड़ में गया बिरयानी', रवी शास्त्रींनी डिवचताच शमी संतापला! त्यानंतर मैदानात आलं वादळ, Video )
 

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. छागला यांनी सांगितले की, न्यायालय लवादाच्या निर्णयाविरुद्धच्या अपीलचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यांनी बीसीसीआयचे आक्षेप फेटाळून लावले. बीसीसीआयनं करार रद्द करणे अयोग्य होते. त्यामुळे त्यांनी फ्रँचायझीला भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं दिले. 

Advertisement

कोची टस्कर्सची टीम 2011 हा एकमेव आयपीएल सिझन खेळली. त्या सिझनमध्ये त्यांनी 14 पैकी 6 सामने जिंकले होते. 10 टीम्सच्या पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम आठव्या क्रमांकावर होती. महेला जयवर्धने, ब्रेंडन मॅक्युलम आणि रवींद्र जडेजा हे दिग्गज खेळाडू या टीमचे सदस्य होते. 
 

Topics mentioned in this article