टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं पद धोक्यात आलं आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकली नाही, तर प्रशिक्षक गौतम गंभीरला हटवले जाऊ शकते. भारतात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर गंभीरला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. बीसीसीआयच्या आढावा बैठकीत गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावर चर्चा झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पराभूत झाल्यापासून फॅन्ससह अनेक माजी खेळाडूंनी गौतम गंभीरवर टीका केली आहे. त्यात आता बीसीसीआयदेखील कठोर भूमिक घेण्याच्या विचारात आहे. भारताला पुढील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीच्या आधारावर गौतम गंभीरचं भविष्य ठरणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
(नक्की वाचा- Team India : गंभीरच्या जवळचा टीम इंडियाच्या बाहेर, दिग्गज खेळाडूंनाही धक्का! BCCI बदलणार नियम)
गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेण्याआधी राहुल द्रविडकडे ही जबाबदारी होती. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. तर वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. तर एशिया कपही जिंकला होता. मात्र गौतम गंभीन सूत्रे हाती घेतल्यानंतर टीम इंडियाची कामगिरी घसलेली पाहायला मिळाली.
( नक्की वाचा : Team India : 6 महिने मिळत नव्हती कुठं संधी, आता 664 ची सरासरी! टीम इंडियात होणार निवड? )
गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निराशाजनक कामगिरी
गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाला बांगलादेशकडून केवळ 2 टी-20 मालिका आणि एक कसोटी मालिका जिंकता आली. या काळात भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसह श्रीलंकेतील वनडे मालिकाही गमवावी लागली होती. गौतम गंभीरचा करार 2027 च्या विश्वचषकापर्यंत आहे, परंतु जर त्याचे चांगले परिणाम न मिळाल्यास त्याला कराराच्या आधी सोडावं लागू शकतं, असंही बोललं जात आहे.