जाहिरात

IPL 2026 Auction: डॉक्टरांनी म्हटलं होतं 12 वर्षेच जगणार, आज आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू

IPL 2026 Auction: आयपीएल ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंच्या नशिबाचे दरवाजे उघडतात, मात्र ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरून ग्रीनची गोष्ट थोडी वेगळी आणि प्रेरणादायी आहे.

IPL 2026 Auction: डॉक्टरांनी म्हटलं होतं 12 वर्षेच जगणार, आज आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू
मुंबई:

IPL 2026 Auction: आयपीएल ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंच्या नशिबाचे दरवाजे उघडतात, मात्र ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरून  ग्रीनची (Cameron Green) गोष्ट थोडी वेगळी आणि प्रेरणादायी आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर पैशांचा पाऊस पाडत त्याला विक्रमी किमतीत आपल्या संघात सामील करून घेतले आहे. या लिलावात ग्रीनने मिचेल स्टार्कचा विक्रम मोडीत काढत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.

ग्रीनला विक्रमी बोली

कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कॅमरून ग्रीनला खरेदी करण्यासाठी तब्बल 25.20 कोटी रुपये खर्च केले. याशिवाय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना यालाही केकेआरने 18 कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या ताफ्यात घेतले आहे. 25 कोटी 20 लाख रुपयांच्या या ऐतिहासिक बोलीमुळे ऑक्शनच्या हॉलमध्ये केकेआरच्या गोटात आनंदाचे वातावरण होते.

( नक्की वाचा : IPL Auction 2026 LIVE: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी )

आज ज्या कॅमरून ग्रीनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तो जगणार की नाही? अशी भीती व्यक्त केली जात होती.  खुद्द ग्रीनने डिसेंबर 2023 मध्ये एका मुलाखतीदरम्यान आपल्या गंभीर आजाराचा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, त्याला किडनीचा एक आजार म्हणजेच 'क्रोनिक किडनी डिसीज' आहे. हा आजार त्याला जन्मजात असून त्या वेळी डॉक्टरांनी अत्यंत भीतीदायक भाकीत केले होते.

ग्रीनच्या म्हणण्यानुसार, तो जेव्हा लहान होता तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितले होते की, तो 12 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही. ज्या वयात मुले खेळायला शिकतात, त्याच वयात ग्रीन मृत्यूशी झुंज देण्याबाबत ऐकत होता. मात्र, या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रीनने केवळ आपले आयुष्यच सावरले नाही, तर तो आज जगातील एक सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात आहे.

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : पृथ्वी शॉ ला साईबाबा पावले ! दोन वेळा निराशा पण, शेवटच्या क्षणी या टीमनं दाखवला विश्वास )

ग्रीनचे पैसे होणार कट

लिलावाच्या नियमांनुसार, कॅमरून ग्रीनला या हंगामासाठी प्रत्यक्ष मानधन म्हणून 18 कोटी रुपये (सुमारे 1.9 मिलियन अमेरिकन डॉलर्स) मिळतील. उर्वरित रक्कम बीसीसीआयच्या परदेशी खेळाडूंच्या नियमांनुसार त्यांच्या प्लेयर डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये जमा केली जाईल. दुसरीकडे, मथीशा पथिरानाला मिळालेली 18 कोटी रुपयांची सर्व रक्कम त्याला मानधन म्हणून मिळेल, कारण ही रक्कम सॅलरी कॅपच्या मर्यादेत येते.

(नक्की वाचा : IPL 2026 Auction : सरफराज खानला मिळाली संधी! फिटनेस सुधारला, रन्सचा पाऊस पाडला, सुरुवातीला निराशा, पण अखेर... )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com