टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईत 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. सध्या न्यूझीलंड ज्या प्रकारचा खेळ खेळत करत आहेत त्यानुसार त्यांच्यावर मात करणे सोपे होणार नाही. मात्र अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल, याबद्दल जाणून घेऊयात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर षटकांची संख्या कमी करून सामना खेळवता येईल. आयसीसीच्या नियमांनुसार, अंतिम सामन्यात किमान 20 षटके खेळणे आवश्यक आहे. प्रत्येक संघाला 20-20 षटके दिली जातील. पाऊस पडल्यास नियोजित वेळेनंतर षटके कमी केली जातात. AccuWeather च्या अहवालानुसार, 9 मार्च रोजी दुबईमध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र जर पावसामुळे हा सामना रविवार, 9 मार्च रोजी खेळवता आला नाही तर तो 10 मार्चला राखीव दिवशी खेळवला जाईल.
(नक्की वाचा- Pakistan Cricket : 3 बॉलमध्ये 4 विकेट्स ! पाकिस्तानमध्ये घडली जगावेगळी गोष्ट)
सुपर ओव्हरचा निर्णय कधी घेतला जातो?
जर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित किंवा बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरद्वारे विजेता निश्चित केला जाईल. सुपर ओव्हरच्या नियमांनुसार, दोन्ही संघांना प्रत्येकी एक षटक खेळण्याची संधी मिळते.
( नक्की वाचा : Mohammed Shami : टीम इंडियाचा हिरो शरियताचा गुन्हेगार! का संतापले मौलाना?)
2002 ला पावसामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होऊ शकला नाही
2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंका अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यावेळी दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नव्हता. त्यानंतर आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. जर पाऊस पडला तर यावेळीही असेच काहीसे घडेल.
आयसीसीच्या मते अंतिम सामना पूर्ण झाला पाहिजे. जर असे झाले नाही तर संयुक्त विजेते घोषित केले जातात. आधी खेळलेल्या सामन्यांच्या आधारे निर्णय घेतला जाणार नाही. सामन्याच्या दिवशी जो संघ अधिक मजबूत असेल तोच विजयी ठरेल.