IND vs PAK : टीम इंडियाचे 5 खेळाडू करणार पाकिस्तानचं पॅकअप, विजेतेपदाच्या शर्यतीतून करणार आऊट!

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना रविवारी (23 फेब्रुवारी) होणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या लढतीकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तानची सुरुवात परस्पर विरोधी झाली आहे. यजमान पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं 60 रन्सनी पराभव केला. तर टीम इंडियानं बांगलादेशचा 6 विकेट्सनं पराभव केला.

पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे. भारताविरुद्ध रविवारी पराभव झाला तर यजमानांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. तर पाकिस्तानचा परााभव करुन सेमी फायनलमधील जागा जवळपास नक्की करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

टीम इंडियाच्या 5 खेळाडूंची भूमिका पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची ठरु शकते. हे खेळाडू कोणते आहेत ते पाहूया

शुबमन गिल

टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन शुबमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. गिलनं शेवटच्या 4 मॅचमध्ये 87, 60, 112 आणि नाबाद 101 रन केले आहेत. गिलनं मागील सलग दोन वन-डेमध्ये सेंच्युरी केली आहे. त्यामध्ये  बांगलादेशविरुद्ध दुबईमध्ये झालेल्या सेंच्युरीचाही समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पहिल्या मॅचमध्ये त्यानं 129 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले होते. भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो पॅव्हिलियनमध्ये परतला होता. आता पाकिस्तानविरुद्धही तो याच आत्मविश्वासनं मैदानात उतरेल.

( नक्की वाचा : IND vs BAN चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाची विजयी सलामी, शुबमन गिलची सेंच्युरी, आता लढत पाकिस्तानशी! )
 

विराट कोहली

आयसीसी स्पर्धेत आणि विशेषत: पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचं नेहमी रौद्र रुप पाहायला मिळतं. टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये विराटनं पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला होता. विराटनं पाकिस्तानविरुद्ध आत्तापर्यंत 16 वन-डे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 52.15 च्या सरासरीनं 678 रन्स केले आहेत. टीम इंडियाच्या माजी कॅप्टननं पाकिस्तानविरुद्ध 3 सेंच्युरी झळकावल्या आहेत. तो रविवारच्या सामन्यातही टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल.  

Advertisement

हार्दिक पांड्या

विराट प्रमाणेच हार्दिक पांड्यानंही नेहमी पाकिस्तानविरुद्ध स्वत:चा खेळ उंचावला आहे. दोन्ही टीम 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध लढल्या होत्या. त्या मॅचमध्येही हार्दिकनं एकाकी झुंज देत आक्रमक हाफ सेंच्युरी झळकावली होती. काही ओव्हर्समध्ये मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता हार्दिककडं आहे.

अक्षर पटेल

अक्षर पटेलचा ऑलराऊंड खेळ टीम इंडियासाठी उपयुक्त ठरतोय. त्याच्या बॅटिंगवर मॅनेजमेंटचा विश्वास वाढलाय. त्यामुळेच त्याला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली आहे. हार्दिकनं तो विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यानं बांगलादेशिरुद्ध सलग दोन बॉलवर दोन विकेट्स घेत बांगला बँटींगला खिंडार पाडले होते. 

Advertisement

( नक्की वाचा : Champions Trophy : अक्षर पटेल कधीही विसरणार नाही रोहितची चूक, कॅप्टननं हात जोडत मागितली माफी! )

मोहम्मद शमी

वन-डे वर्ल्ड कप 2023 मध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमीनं चॅम्पिन्स ट्रॉफीतही झोकात एन्ट्री केली आहे. शमीनं पहिल्याच मॅचमध्ये बांगलादेशविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या. आता तो पाकिस्तानविरुद्धही दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.

( नक्की वाचा : Mohammed Shami: मोहम्मद शमीसारखं कुणी नाही, जग 'या' रेकॉर्डसाठी ठेवणार लक्षात )
 

Topics mentioned in this article