भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून मुंबईतील वानखेडे स्टेडियमची ओळख आहे. वानखेडेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) खास कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांचं (Sharad Pawar) जोरदार कौतुक केलं आहे. वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला शरद पवारांचं नाव देण्यात आलं. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. शरद पवारांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाबाबतचा गौरवानं उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री?
क्रिकेटच्या क्षेत्रातील शरद पवार साहेबांचे योगदान नेहमीच लक्षात राहील, असं मुख्यमंत्र्यांनी या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करत आहे. त्यांनी (MCA) हा अतिशय चांगला निर्णय घेतला. शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये विशेषत: भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत, त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचे नाव हे अग्रणी असेल. या क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी काम केलं आहे. ICC, BCCI, MCA अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. आज ज्या पातळीवर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय त्यामध्ये त्यांचं अतिशय मोठं योगदान आहे. त्यांचं नाव स्टँडला देणं हा अतिशय योग्य प्रकारचा निर्णय MCA नं घेतला आहे, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या योगदानाचा उल्लेख केला.
( नक्की वाचा : Team India : सचिन, सौरव आणि द्रविड ही 'या' कॅप्टनला देत नसत उलट उत्तर! सेहवागनं सांगितलं त्याचं नाव )
देर आए, दुरुस्त आए
टीम इंडियाचे माजी कॅप्टन अजित वाडेकर यांचंही नाव वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला देण्यात आलं. हा निर्णय घेण्यास उशीर झाला अशी खंत अजित वाडेकर यांच्या पत्नींनी व्यक्त केली. तो धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी यावेळी देर आए, दुरुस्त आए, अशी भावना बोलून दाखवली.
अजित वाडेकर यांनी 1971 मध्ये ज्यांनी आपल्याला परदेशात जिंकण्याची भेट दिली. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन सीरिज जिंकल्या. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. वहिनी (अजित वाडेकर यांच्या पत्नी) म्हणाल्या की उशीर झाला. पण, मी म्हणेल 'देर आए, दुरुस्त आए' त्यांचं नाव उशीरा आलं असलं तरी प्रत्येक फॅन्सच्या ऱ्हदयात कोरलेलं आहे. ते आज एमसीएच्या स्टँडवर जातंय. ही आनंदाची बाब आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.