
Virender Sehwag Big Statement: जगातील काही दिग्गज क्रिकेटपटूंचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं. भारतीय टीममध्येही असे काही खेळाडू होते. जे आजही क्रिकेट फॅन्सचे लाडके आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) हे यामधील प्रमुख खेळाडू आहेत. या त्रिमूर्तीला टीममध्येही नेहमी आदरापूर्वक वागणूक मिळाली. ते खेळत होते त्यावेळी कोणता खेळाडू त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलत नसे. पण, एक असा खेळाडू होता जो या तिघांचीही उलटतपासणी करु शकत असे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडियाचा माजी आक्रमक बॅटर वीरेंद्र सेहवागनं एका चर्चेदरम्यान त्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे. तो खेळाडू अन्य कुणी नसून माजी दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे (Anil Kumble) होता. सेहवागनं या विषयावर बोलताना सांगितलं की, 'तो एकमेव असा कॅप्टन होता ज्याला मी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीवर चिडलेलं बघितलं आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये तो एकमेव असा होता की ज्याला त्यांनी कधीही उलट उत्तर दिलं नाही.'
या विषयावर बोलताना सेहवाग पुढं म्हणाला की, 'आम्हाला राग येत असे. कधी दादा किंवा द्रविडही नाराज होत असतं. आम्ही यार काय बोलतोय, असं म्हणत असू. पण, जेव्हा कुंबळे चिडलेला असे त्यावेळी त्याला कुणीही उलट उत्तर कधी दिलं नाही. सर्वजण शांतपणे मान खाली घालून निघून जात. अनिल कुंबळेचा टीममध्ये इतका आदर होता.
( नक्की वाचा : India Tour of England : विराट-रोहितशिवाय कशी असेल टीम इंडिया? 'या' 17 जणांची होऊ शकते इंग्लंड दौऱ्यासाठी निवड )
अनिल कुंबळेचा जगातील महान बॉलरमध्ये समावेश होतो. तो आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा चौथा बॉलर आहे. तर भारताकडून सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा बॉलर आहे.
कुंबळेनं 132 टेस्ट आणि 271 वन-डे मध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. त्यामधील 236 इनिंगमध्ये 29.65 च्या सरासरीनं 619 तर 265 वन-डे इनिंगमध्ये 30.9 च्या सरासरीनं 337 विकेट्स घेतल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world